आता ‘फिंगरप्रिंट’नं लॉक-अनलॉक करा WhatsApp, ‘असं’ करा फोनमध्ये ‘अ‍ॅक्टिव्ह’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांच्या सुरक्षेसाठी व्हाट्सअ‍ॅप अनेक नवीन फिचर दरवेळी लाँच करत असते. यावेळी देखील कंपनीने एक नवीन फिचर आणले आहे. फिंगर प्रिंट लॉक नावाचे हे नवीन फिचर असून यामध्ये तुम्ही अ‍ॅप फक्त तुमच्या फिंगर प्रिंटनेच उघडू शकता. आयफोन युजर्ससाठी कंपनीने आधीच हे फिचर Touch ID नावाने लाँच केले आहे. त्यानंतर सध्या व्हाट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये हे फिचर काम करत आहे.

अँड्रॉइडवर अशा प्रकारे वापरा –
यासाठी तुम्ही व्हाट्सअ‍ॅप बीटा युजर्स असायला हवेत. सध्या अँड्रॉइडमद्ये हे फिचर केवळ बीटा व्हर्जन वाल्यांसाठीच उपलब्ध करून दिले आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर प्रायव्हसी पर्यायात जाऊन त्यावर फिंगर प्रिंट लॉकवर जाऊन तो पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुमचे हे फिचर सुरु होईल. आयओएस व्हर्जनवर देखील हे फिचर उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी तुमच्याकडे 2.19.20 व्हर्जन असायला हवे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसी पर्यायावर क्लिक केल्यानंतर ऑन-ऑफ टॉगल बरोबर स्क्रीन लॉकचे दोन पर्याय दिसतील. यावर तुम्ही हा टॉगल चालू केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये हे फिचर सुरु होईल.

दरम्यान, कंपनीने या फीचरची टेस्टिंग सुरु केली असून लवकरच सर्व ग्राहकांना हे फिचर उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना या नवीन फीचरची उत्सुकता लागली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या