जेष्ठ अभिनेते कादर खान व्हेंटिलेटरवर ; प्रकृती गंभीर 

वृत्तसंस्था : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. ८१ वर्षीय कादर खान यांच्यावर कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कादर खान यांना ‘प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर’ हा आजार आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या मेंदूवर याचा मोठा परिणाम झाल्याचे समजते आहे. डॉक्टरांनी  त्यांना बाइपेप व्हेंटिलेटर वर ठेवले आहे. कादर खान अनेक वर्षांपासून त्यांचा मुलगा सरफराज खान आणि त्यांची सून शाहिस्ता खान यांच्यासोबत कॅनडात राहत आहेत. यापूर्वी  त्यांनी २०१५ साली ” दिमाग का दही ” नावाच्या सिनेमात काम केले आहे.
कादर खान केवळ उत्तम अभिनेते नाहीत  तर उत्तम डायलॉग रायटर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. ३०० पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी अभिनयाचे काम केले आहे. तसेच २५० चित्रपटांकरिता त्यांनी डायलॉग रायटिंग चे काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर कॅनडा येथे उपचार सुरु होते. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे समजते आहे. २०१७ मध्ये त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. गेल्या काही वर्षापासून त्यांची प्रकृती सतत खालावत चालली असल्याचे समजते आहे.
‘प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर’ हा व्यक्तीच्या मेंदूशी निगडीत आजार आहे. या आजारात शरीराची गती , बोलणे, चालणे,गिळणे,पाहणे ,विचार करणे या गोष्टीवर परिणाम होतो. या आजारात मेंदूच्या सर्व सेल्स सुद्धा हळुहळू नष्ट व्हायला लागतात.
कादर खान यांनी ‘डाग’ या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ‘कुली’, ‘होशियार’, ‘हत्या’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. नव्वदीच्या तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि लिखाणासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.