Vicky Kaushal Engagement | कतरीना कैफसोबत अफेयरची चर्चा सुरू असतानाच विक्की कौशलने सांगितली मनातील गोष्ट, म्हणाला – ‘लवकरच करणार साखरपुडा’
मुंबई : Vicky Kaushal Engagement | विक्की कौशल सध्या चित्रपटांसह रिलेशनशिप (Vicky Kaushal Engagement) बाबत चर्चेत आहे. मोठ्या कालावधीपासून चर्चा आहे की तो कतरीना कैफ (Katrina Kaif) ला डेट करत आहे. मात्र, दोघांनी यावर आजपर्यंत काहीही उघडपणे म्हटलेले नाही. काही दिवसांपूर्वी अफवा होती विक्कीने कतरीनासोबत सारखरपुडा केला आहे. नंतर कतरीनाच्या टीमने ही बाब नाकारली. आता विक्की आपला चित्रपट ‘सरदार उधम’ (Sardar Udham) चे प्रमोशन करण्यात व्यस्त असतनाच त्याने आपल्या वैयक्तिक जीवनाच्या प्लानिंगबाबत सुद्धा वक्तव्य केले आहे.
साखरपुड्यावर काय म्हणाला…
विक्कीने या अफवांना केवळ मीडियाचे योगदान म्हटले. तो म्हणाला की, जेव्हा वेळ येईल तेव्ही मी साखरपुडा सुद्धा करेन. ई-टाइम्ससोबत बोलताना विक्की म्हणाला की, अशाप्रकारच्या बातम्या तुमच्या मित्रांनीच पसरवल्या आहेत. (हसत-हसत म्हणाला) मी लवकर साखरपुडा (Vicky Kaushal Engagement) सुद्धा करेन…जेव्हा वेळ येईल. त्याचीही वेळ येईल.
अनेक ठिकाणी दिसले सोबत
विक्की कौशल आणि कतरीना कैफमध्ये अफेयर असल्याची चर्चा तेव्हा पहिल्यांदा सुरू झाली जेव्हा अंबानी यांच्या होळी पार्टीत दोघे एन्जॉय करताना दिसले होते.
त्यानंतर कधी विक्की, कतरीनाच्या घरी जाताना दिसला तर कधी एखाद्या इव्हेंटमधून दोघे बाहेर पडताना दिसले.
शुक्रवारी ‘सरदार उधम’च्या स्क्रिनिंगसाठी सुद्धा कतरीना पोहचली होती.
घरच्यांची काय होती रिअॅक्शन
विक्की कौशलचा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) ने स्पॉटबॉय (Spotboy) सोबत बोलातना म्हटले होते की, मला आठवतेय की विक्की सकाळी जिममध्ये गेला होता जेव्हा अशा बातम्या येऊ लागल्या.
जेव्हा तो घरी आला तेव्हा मॉम आणि डॅडने गंमतीने विचारले, अरे तुझा साखरपुडा झाला, मिठाई तरी खाऊ घाल.
तेव्हा विक्कीने त्यांना म्हटले, जेवढा खरा साखरपुडा झाला आहे, तेवढी खरी मिठाई सुद्धा खा.
PM Kisan | लवकर दुरूस्त करा आपले नाव आणि आधारसंबंधी चुका, ‘या’ दिवशी येईल PM Kisan चा 10वा हप्ता