कार्तिक आर्यननंतर करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ मध्ये कोणाची होणार ‘एन्ट्री’?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड निर्माता करण जोहर सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘दोस्ताना २’ साठी अभिनेता शोधत आहे. नुकताच त्याने अभिनेता कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ चित्रपटातून डच्चू दिला आहे. कार्तिक आर्यनच्या उद्धाट वागण्यामुळे प्रोडक्शन हाऊसने त्याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जाते आहे. आता या सिनेमासाठी करण जोहर दुसऱ्या अभिनेत्याचा शोध घेत आहे.

२० दिवसांचं शूटिंग केल्यानंतर कार्तिकला चित्रपटाचा दुसरा भाग आवडला नाही. त्याने सिनेमात बदल करण्याची मागणी केली पण करणने हे अजिबात मान्य नव्हते. आता या सिनेमासाठी बी-टाऊनमधल्या दोन अभिनेत्यांची नावं समोर येतायेत. करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटासाठी विकी कौशल आणि राजकुमार राव यांची नावे चर्चेत आहेत. विकी कौशलची या सिनेमात एन्ट्री होऊ शकते आणि विकीसोबत चर्चा निष्फळ ठरली तर राजकुमार रावची वर्णी लागू शकते. विकीचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे लवकरच तो या सिनेमाची शूटिंग सुरु करु शकतो.

विकी कौशल कोरोना होण्यापूर्वी ‘मिस्टर लेले’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. याशिवाय विकीच्या आणखी २ सिनेमांवर काम सुरु आहे. आता करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मधून कार्तिक आर्यन आऊट झाल्यानंतर कोणाची वर्णी लागते हे मेकर्सचं सांगू शकतील. चित्रपटाचे शूटींग मुंबई व चंदीगड येथे पूर्ण झाल्याची माहिती आहे. आधी या सिनेमाची शूटिंग लंडनमध्ये होणार होती, पण कोरोनामुळे ‘दोस्ताना २’चे संपूर्ण शूटिंग भारतातच करण्यात आले.