मूळची भारतीय प्रिया बनली ‘मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मूळची भारतीय असणारी प्रिया सेराव हिने मिस युनिव्हर्स हा ऑस्ट्रेलियाचा किताब आपल्या नावावर केला आहे. शुक्रवारी प्रियाने हा किताब जिंकला आहे. विविधता आणि बहुसंस्कृतीवाद बाबत जागरुकता पसरवण्याचा हेतू ठेवणाऱ्या प्रियाने हा किताब जिंकल्यानंतर आपल्या प्रियजणांसोबत आणि मित्रांसोबत विजयाचा आनंद साजरा केला.

एका वृत्तसमूहाने दिलेल्या माहितीनुसार, व्हिक्टोरिया राज्याची धोरण सल्लागार असणाऱ्या २६ वर्षीय प्रियाने गुरुवारी रात्री मेलबर्नमध्ये एका डझनहून अधिक इतर फायनलिस्टना हरवून हा किताब आपल्या नावावर केला आहे. पुढील वर्षी दक्षिण कोरिया मध्ये होत असलेल्या मिस युनिव्हर्स या स्पर्धेत प्रिया सेराव ऑस्ट्रेलियाचे प्रितिनिधित्व करेल.

प्रिया सेरावचा जन्म कर्नाटकमधील बेलामनु मध्ये झाला होता. परंतु प्रियाने आपले अधिकाधिक लहानपण ओमान आणि संयुक्त अरब अमीरात मध्ये घालवलं आहे. प्रिया जेव्हा ११ वर्षांची होती तेव्हाच ती ऑस्ट्रेलियात गेली होती. कायद्याची पदवी घेतलेली प्रिया म्हणते की, “तिमोर-लेस्तेमध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमासाठी इंटर्नच्या रुपात काम करणं माझ्यासाठी सर्वात गौरवशाली क्षण राहिले आहेत.”

पहलू खान लिंचिंग प्रकरण : कॉंग्रेस आता भाजपची कॉपी बनले आहे : ओवेसी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

कोंढवा दुर्घटनेची सखोल चौकशी करा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘किकबॉक्सिंग’ने घालवा राग आणि तणाव