जेवण करून उशिरा का आलास ?, एका जवानाने दुसर्‍या जवानावर ‘डागले’ पिस्तूल, पुढे झाले असे काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ब्राझील पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शुक्रवारी साओ पाउलो येथे घडलेल्या घटनेने घटनास्थळी उपस्थित लोकांना धक्का बसला. जेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या ज्युनियरवर फक्त पाच मिनिटे उशिरा आला म्हणून पिस्तूल डागले. हा क्षण कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यासाठी धक्कादायक असू शकतो.

पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या सहकाऱ्यावर डागले पिस्तूल

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या ज्युनियर वर पिस्तूल डागले, तेव्हा हे दृश्य पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते, की ज्युनिअर आपल्या सीनियर अधिकाऱ्याचा हात मागे खेचण्याचा प्रयत्न करीत आहे.

अहवालानुसार लष्करी पोलीस कर्मचारी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीवर गेला आणि त्यास पाच मिनिटे उशीर झाला. यामुळे त्याचा वरिष्ठ अधिकारी संतापला. त्यानंतर ज्युनियरवर पिस्तूल डागली गेली. या दोघांमधील वादविवाद पाहून इतर अधिका-यांनी उडी घेत वरिष्ठ जवानांना ताब्यात घेतले.

लज्जास्पद देखावा समोर आल्यानंतर लष्करी पोलिसांनी ‘अत्यंत गंभीर’ आणि ‘अप्रिय घटने’चे वर्णन केले आहे. त्यांनी दोन्ही सैनिकांना निलंबित केले आणि घटनेच्या तपासाची माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, “ही वृत्ती संस्थेच्या मूलभूत मूल्यांचे, विशेषत: शिस्त, वर्गीकरण, व्यावसायिकता, आदर आणि मानवी सन्मानाचे उल्लंघन करते. आरोप सिद्ध झाल्यास कठोर शिक्षेची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.”