Video : आजही जनता दरबारास धनंजय मुंडेंची उपस्थिती, सोडविले नागरिकांचे प्रश्न अन् दिल्या कार्यकर्त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. बलात्काराचा (rape) आरोप झाल्याने धनंजय मुंडे (Thackeray government) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सुत्र सुरु आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या जनता दरबारला ते हजर राहणार का अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी नेहमीप्रमाणे पक्ष कार्यलयात येऊन जनता दरबारला (Janata Darbar) हजेरी लावून चर्चांना पूर्णविराम दिला.

या जनता दरबारात उपस्थित राहून, जनतेच्या भेटी घेऊन धनंजय मुंडे यांनी जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. धनंजय मुंडे यांनी आज सकाळपासूनच त्यांच्या सरकारी निवासस्थान चित्रकूट येते सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. तसेच त्यानंतर त्यांनी दुपारी जनता दरबार मध्ये हजेरी लावली. अनेक अरोपांचे सत्र सुरु असताना, गंभीर वातावरणात देखील धनंजय मुंडे यांनी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनता दरबारामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता. ते या ताणावातच आपलं कार्यालयीन काम करत असल्याचे पहायला मिळाले.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. मात्र अद्याप मुंडे यांनी माध्यमासमोर येऊन प्रतिक्रिया दिली नाही. मीडियाचा ससेमिरा चुकवण्यासाठी भल्या पहाटे खासगी कारने चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले, त्यावेळी त्यांच्यासोबत कोणताही सुरक्षा ताफा नव्हता. यानंतर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दुपारी 2 ते 4 दरम्यान होणाऱ्या जनता दरबारामध्ये धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.