Video : पुण्यात भरदिवसा बिल्डरवर गोळीबार, फायरिंगची घटना CCTV मध्ये कैद (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  डुक्कर खिंड भागात इस्टेट एजंट-बिल्डरवर भरदिवसा झालेल्या गोळीबाराचा (Firing) थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एखाद्याचे नशीब बलवत्तर असल्यास काय होऊ शकते ते सीसीटीव्ही पाहूनच तुम्हाला समजेल. कारण, कानाजवळ येऊन गोळी झाडल्यानंतर देखील गोळी लागली नाही. तर पळून जातानाही हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यातील एकही गोळी लागली गेलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी याच नशीबच भारी असे म्हणत आश्चर्य व्यक्त केला आहे.

रवींद्र सखाराम तागुंदे (वय ३६, रा. वारजे) असे या गोलीबारात वाचलेल्या बिल्डरचे नाव आहे.
याप्ररकणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : गंभीर गुन्हे करणार्‍या ओंकार गुंजाळ अन् त्याच्या 4 साथीदारांवर मोक्का

आज सकाळी डुक्कर खिंड येथे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
डुक्कर खिंड येथे त्यांची प्लॉटिंग आहे याठिकाणी ते एका कार आल्याने दरवाजा जवळ बोलत उभा होते.
त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन दुचाकीवरील हल्लेखोरांनी गोळीबार (Firing) केला.
एक दुचाकीवर दोघे अगदी जवळ कानामागे आले आणि एक गोळी झडली.
पण ते खाली वाकले आणि ती गोळी चुकवली. त्यानंतर लागलीच त्यांनी पळ काढला. यानंतर गोळीबार करण्यास सुरुवात केली, असे या सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 641 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

Medical Exam : वैद्यकीय परीक्षा ऑफलाईनच ! परीक्षार्थ्यांना RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक

विहिंपनं व्यक्त केला संताप, म्हणाले – ‘ट्विटर ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागायला लागलंय, इथूनच पैसा कमावायचा अन् …’