#VIDEO Viral : पुण्यातील प्रसिद्ध ‘एस.पी.’ज् बिर्य़ाणीमध्ये जेवणाच्या ताटात आढळल्या आळ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या एस.पी.’ज बिर्य़ाणी या ठिकाणी बिर्याणीमध्ये आळ्या सापडल्याची घटना समोर आली आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास ही प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ग्राहकाने उघडकीस आल्यानंतर एस.पी.’ज बिर्य़ाणी हाऊसच्या मालकांनी आरेरावी केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

विरेंद्रसिंग ठाकूर हे सदाशिव पेठेतील एस.पी.’ज बिर्याणी हाऊस येथे मुलासोबत जेवणासाठी गेले होते. त्यांनी बिर्याणीची ऑर्डर दिली होती. त्यांना देण्यात आलेल्या बिर्याणीमध्ये आळ्या आढळल्या. ठाकूर यांनी याचा व्हिडीओ काढून घेऊन ही बाब हॉटेल प्रशासनाच्या नजरेस आणून दिली. मात्र, हॉटेल प्रशासनाने या बाबद दिलगीरी व्यक्त करण्या ऐवजी आरेरावी केली.

चटकदार बिर्याणीचे खवय्यांचे पुरेपुर लाड पुरविणाऱ्यासाठी “एस.पी.’ज बिर्याणी पुण्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आज या ठिकाणी बिर्य़ाणीमध्ये आळ्या सपडल्याने पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरु आहे का असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केली आहे. या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करुन आज झालेल्या प्रकाराबदल हॉटेल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुण्यामध्ये अशा प्रकारची टोळी आहे. ही टोळी खाण्याचे बिल चुकवण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य करत असतात. बिर्याणीमध्ये असलेल्या मटणाचा चुरा होत असेल तर आळीच काय होत असेल याचा अंदाज आपण करावा. हा जो प्रकार आज घडाला आहे तो हॉटेलला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र आहे. यापूर्वी अशा प्रकरची घटना घडलेली नाही आणि भविष्यात घडणार ही नाही अशी प्रतिक्रीया एस.पी.’ज बिर्य़ाणी मालक जव्हार चोरगे यांनी दिली आहे.