Video : सीमा वादादरम्यनच व्हायरल झाला भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या ‘हिंसक’ झटापटीचा व्हिडीओ

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – भारत आणि चिनी सैन्याच्या दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाबद्दल आज देशभरात संताप आहे. चिनी सैन्याने केलेल्या फसवणूकीमुळे भारताचे 20 जवान शहीद झाले. आता या रक्तरंजित संघर्षाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. तो व्हिडीओ भारत आणि चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीचा असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

खरं तर, एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, हा 15 जूनच्या घटनेचा आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांशी झटापट करताना दिसत आहेत. यात प्रत्येकजण मास्क घातलेले दिसत आहे आणि असा विश्वास आहे की, हा गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षाचा व्हिडिओ आहे.

https://twitter.com/FrontalAssault1/status/1275020625149677685

5-16 जून रोजी चीनी सैन्याने गलवान खोऱ्यामध्ये भारत-चीन लाईन ऑफ अ‍ॅक्युचल कंट्रोल (LAC) वर दोन्ही सैन्याच्या दरम्यान झालेल्या संघर्षामध्ये लोखंडी रॉडचा वापर केला होता. यामध्ये भारतीय सैन्याच्या कर्नलसह 20 सैनिक शहिद झाले होते. चिनी सैनिकांचेही नुकसान झाले.

या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. मात्र या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली होती. त्याच वेळी, गलवान खोऱ्यात हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणीही आमच्या सीमेमध्ये प्रवेश केला नाही किंवा आमची कोणतीही पोस्ट इतर कोणाच्या ताब्यात नाही. आमचे 20 बहाद्दर लडाखमध्ये शहीद झाले पण ज्यांनी भारत माताकडे डोळे वर करुन पाहिले होते त्यांना ते धडा शिकवून गेले.