Video : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत राखी सावंत पुन्हा ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रामा क्विन राखी सांवत नेहमीच ट्रोल होत असते. राखीला ट्रोल होण्यासाठी कारण लागत नाही. प्रत्येकवेळी तिला युजर्सच्या ट्रोलचा सामना करावा लागतो. सध्या राखी वेगळ्या कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे. यावेळी ती एकदम वेगळ्या अंदाजात दिसून आली आहे. राखीने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. या फोटोंमध्ये राखी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत दिसत आहे. यामध्ये ती खूपच सेक्सी दिसत आहे.

या फोटोमुळे राखी पुन्हा ट्रोल झाली आहे. सोशल मिडियावर युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. फोटोला पाहून इन्स्टाग्रामवर यूजरने पोस्ट लिहली की, ‘जबरदस्तीने त्या पार्टीमध्ये सामील झालीस ना’, दुसऱ्या युजरने लिहले की, ‘एवढ्या मोठ्या हारामध्ये जागा मिळत नाही वाटत’, एका युजरने ट्रोल करताना लिहले की, ‘तुम्ही कुठे कुठे जाता, तुम्हाला कोण-कोण बोलवत असते.’, अजून एका युजरने लिहले की, ‘राखी आन्टी राजनितीमध्ये या’. राखीने या फोटोमध्ये सिल्वर कलरची साडी नेसली आहे.

राखीच्या या फोटोंना काही चाहत्यांनी लाईक केले आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राखी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचे खूप कौतुक करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राखीने मिनिमल मेकअप, रेड कलरची लिपस्टिक, हाथामध्ये बांगड्या घातल्या आहेत. राखीने एक आयटम सॉंग केले आहे यामध्ये ‘छप्पन छुरी’ गाण्यामध्ये डान्स करताना दिसली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?