Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | अपात्रते संदर्भात सुनावणी सुरू असताना राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) एक आठवडा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. घाना या देशात पार पडणाऱ्या 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला ते हजेरी लावणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांच्यासह राहुल नार्वेकर घाना दौऱ्यावर जाणार आहेत. आमदार अपात्रतेसंदर्भातील (MLA Disqualification Case) सुनावणी सुरु असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) परदेश दौऱ्यावर जाणार आहेत.

घाना देशात 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय परिषद होणार आहे. या परिषदेत जगातील विविध देशांमधील संसद विधीमंडळ (Parliament Legislature) प्रमुखांची उपस्थिती असेल. जागतिक संसदीय आणि राजकीय प्रश्नांवर या परिषदेमध्ये विचारमंथन होणार असून राहुल नार्वेकरसुद्धा या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर

शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रेबाबत दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांबाबत
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
याप्रकरणी निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरुन नुकतेच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांना फटकारले होते. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांच्याकडून वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने अखेर अपात्रेबाबतच्या सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) वकील असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांनी याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे.

https://x.com/AsimSarode/status/1706905954464464900?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरण ! नवरात्रीत पहिली सुनावणी, दिवाळीनंतर उलट तपासणी; विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रतेचं वेळापत्रक तयार?

BJP leader Shahnawaz Hussain | भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका