शकुंतला देवींच्या भूमिकेसाठी माझाच चेहरा ‘परफेक्ट’, विद्या बालनचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी एका वैज्ञानिकांची भूमिका साकारली होती. त्यानंतर विद्या आता एक थोर गणिती शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित एका चरित्रात्मक चित्रपटामध्ये मध्ये झळकणार आहे.

विद्या ने केला बॉब कट

विद्या ने मिड-डे ला दिलेल्या एक मुलाखतीत असे सांगितले कि, चित्रपट निर्माते अनु मेनन निर्माण करत असलेल्या चित्रपटात ह्यूमन कंप्यूटर ची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी त्या दिशेने तयारी सुद्धा सुरु केली आहे. मध्यंतरी विद्या ने लूक टेस्ट साठी ब्राऊन रंगाची साडी आणि आपल्या केसांचा बॉब कट केलेल्या दिसून आला. या भूमिकेला मी स्वत: ची ओळख देण्यासाठी ती खूप उत्सुक आहे. असेही ती म्हणाली. भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठीच मी बॉब कट केला आहे . माझा साऊथ इंडियन चेहरा या भूमिकेसाठी चांगलाच जुळतो आहे.

शकुंतला देवी यांच्या व्यक्तिमत्वाने घातली भुरळ

तुम्ही हा चित्रपट करण्यासाठी का निवडला या मुलाखततीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विद्या म्हणाली, शकुंतला देवी यांचं सर्वांना आकर्षित करेल असं व्यक्तिमत्व या चित्रपटाचा विषय असल्यामुळे मला या चित्रपटाची कथा भावली. त्यामुळेच हा चित्रपट करण्याचे मी निवडले असे ती म्हणाली. चित्रपटात मी त्यांच्या वयाच्या वीस वर्षांपासून करिअर च्या शेवटपर्यंत भूमिका वाढणार आहे.

महिला-केंद्रीत चित्रपट नवीन नाहीत

महिला केंद्र-बिंदू असणाऱ्या अनेक चित्रपटामध्ये विद्या यांनी काम केलेले आहे. तशी त्यांची ओळखही आहे. करिअर च्या सुरवातीपासून अनेक मोठ्या प्रसिद्ध चित्रपटात काम केलेले आहेत. ज्यात चित्रपट महिलांच्या कामगिरी साठी आणखी पूरक वातावरण निर्माण केले. असणारा हा काही पहिलाच चित्रपट नाहीये.

मिशन मंगल या चित्रपटात विद्या बालन सोबत अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ति कुल्हारी और शरमन जोशी यांनी काम केले हे. विद्या यांनी महिला वैज्ञानिकांची भूमिका बजावलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अजूनही चित्रपट, चित्रपट गृहात चालू आहे. चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात १०० कोटींची कमाई केली होती. आणखीही तिकीटबारीवर चित्रपट चांगली कमाई करतोय.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like