प्रेग्नंसीबाबत पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री विद्या बालन, दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून विद्या बालनच्या प्रेग्नंसीवरुन अफवा उठविण्यात आल्या होत्या. चित्रपटसृष्टीत अभिनेत्रीना लग्नानंतर प्रेग्नेंसीवरुन नेहमीच काहीना काही प्रश्न विचारले जातात. कधी लोक त्यांना असे प्रश्न विचारतात तर कधी माध्यमांमध्ये त्या प्रेग्नेंट असल्याचे दावे केले जातात. अशाच प्रेग्नेंट असण्याच्या अफवा अभिनेत्री विद्या बालन बद्दलही उठविण्यात आल्या होत्या. मात्र तिने नुकत्याच अशा काही प्रतिक्रिया दिल्या आहेत की, तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अफवा उठविणाऱ्यांची बोलतीच बंद होईल.

एका मुलाखतीदरम्यान ती प्रेग्नेसीवरुन खुलुन बोलली आहे. मागील सात वर्षांपासून मी अशा प्रकारच्या अफावांना सामोरी जात आहे. मात्र मी प्रेग्नेंट नाही. माझे पोट सपाट नाही हे सांगण्यात मला काहीच लाज वाटणार नाही. माझा एखादा स्टायलिश ड्रेस माझ्यावर फिट झाला म्हणजे मी प्रेग्नेंट आहे अस नाही. माझ्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांशिवाय तुम्हाला दुसरे काही काम नाही का? प्रेग्नेसीच्या अफवा उठविणाऱ्यांना या कडक शब्दात उत्तर दिले आहे.

विद्या बाललने २०१२ मध्ये चित्रपच निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले आहे. नुकताच तिचा मिशन मंगल हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि कृति कुल्हारी महत्वपुर्ण भुमिकेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like