‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सिनेमा हॉलही बंद आहेत. अनेक सिनेमांची रिलीज लटकली आहे. अशात आता मेकर्स ऑनलाईन रिलीजकडे वळत आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर गुलाबो सिताबो हा सिनेमा देखील अ‍ॅमेझॉन प्राईवर रिलीज झाला आहे. अशात आता विद्या बालन हिचा शकुंतला देवी हा सिनेमा देखील अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीजसाठी तयार आहे. नुकतीच सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

विद्यानं तिच्या इंस्टावरून शकुंतला देवी सिनेमाचं मोशन पोस्ट शेअर केलं आहे. सोबतच तिनं रिलीज डेटचाही खुलासा केला आहे. मोशन पोस्टर शेअर करताना विद्या म्हणते, “गणिताच्या जादूगार शकुंतला देवी यांना भेटण्यासाठी तयार व्हा. 15 जुलै रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे तर 31 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.”

अॅमेझॉन प्राईमनंदेखील सिनेमाचे दोन मोशन पोस्ट शेअर करत सिनेमाच्या रिलीजबद्दल माहिती दिली आहे. इंस्टावरून त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

सिनेमाबद्दल थोडक्यात…

शकुंतला देवी या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा गणित तज्ञ शुकंतला देवी यांच्या जीवनावर आधारीत आहे. या सिनेमात विद्या बालननं शकुंतला यांची भूमिका साकारली आहे. विद्यासोबतच सान्या मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहे जिनं विद्याच्या म्हणजेच शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. सिनेमात अमित साध आणि जिस्शु सेनगुप्ता हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनु मेनन यांनी सिनेमा डायरेक्ट केला आहे.