Vidyarthi Sahayak Samiti | जीवनाला आकार देणाऱ्या समाजाच्या मदतीची जाणीव ठेवावी : प्रतापराव पवार

प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीमधील विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मंडळातर्फे सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vidyarthi Sahayak Samiti | “आयुष्याची जडणघडण होताना कुटुंबासह विविध संस्था, व्यक्ती, समाज यांचे साहाय्य महत्वपूर्ण असते. यशाची शिखरे गाठताना वाटेवर मदतीला आलेल्यांचे ऋण विसरू नयेत. सामाजिक जाणीव ठेवून समाजाला परत देण्याची वृत्ती अंगीकारावी. संस्थेने दिलेले संस्कार, शिकवण प्रत्यक्ष कामात उतरवावी,” असे मत विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. (Vidyarthi Sahayak Samiti)

माजी विद्यार्थी मंडळातर्फे प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीमधील विद्यार्थ्यांच्या सत्कारावेळी पवार बोलत होते. समितीच्या आपटे वसतिगृहात झालेल्या समारंभावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे यांच्यासह समितीचे विश्वस्त, कार्यकर्ते, आजी-माजी विद्यार्थी, पर्यवेक्षक, देणगीदार उपस्थित होते. (Vidyarthi Sahayak Samiti)

पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट, सहायक संचालक (वित्त व लेखा विभाग) पूजा दाभाडे, मंत्रालय कक्ष अधिकारी विशाल ढोले, चक्रधर रासकर, सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. पांडुरंग गरदरे, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलम महाडिक, सोनाली इंगळे, सनदी लेखापाल भरत जाधव व आकाश पवार, विक्रीकर निरीक्षक सागर सरोदे, पोलीस उपनिरीक्षक भीमेश कोटला, ज्ञानेश्वर दुधेकर, काजल सरोदे, गोविंद बेडके, सहायक रासायनिक विश्लेषक सखी शेडगे यांना मानपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतापराव पवार म्हणाले, ” चांगले लोक सगळीकडे हवे असतात. स्वतःच्या पायावर हिमतीने उभे राहताना अनेकजण मदतीला येतात. अपयशाने खचून न जाता जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले, तर यश मिळते. माजी विद्यार्थी हे समितीचे भांडवल आहे. आपल्या यशात योगदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञ रहा. अनुभवातून शिका. चांगल्या गोष्टींचा, ज्ञानाचा सदुपयोग करा. दिलेला शब्द, वेळ पाळा. सहकार्य, सौहार्दाच्या भावनेतून समाजहिताचे प्रामाणिक काम करा.”

तुषार रंजनकर म्हणाले, “समितीमधील विद्यार्थी मोठ्या संख्यने अधिकारी होताहेत, ही आनंदाची बाब आहे. इथे मिळालेले संस्कार, शिकवण कायम स्मरणात ठेवा. कठीण परिस्थितीत समितीचा, इतरांचा जसा आधार मिळाला, तसाच आधार तुम्ही देखील अडचणीत असलेल्याना द्या.”

राजू इंगळे यांनी माजी विद्यार्थी म्हणून संस्थेच्या कामात योगदान द्यायला हवे,
असे आवाहन केले. समितीतील संस्कारांची शिदोरी अधिकारी म्हणून काम करताना उपयोग येईल,
असे सांगितले. तुकाराम गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. मंडळाचे सचिव सुनील चोरे
यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव मनीषा गोसावी यांनी आभार मानले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर