Vijay Shivtare | मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्या सभेपूर्वीच शिवतारेंनी व्यक्त केली मनातील खदखद, ”…म्हणून आमचा राग आहे”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vijay Shivtare | अजित पवारांना (Ajit Pawar) बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) आव्हान देत अपक्ष लढण्याची तयारी केलेले शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी घेतलेली माघार हा राज्यभरात चर्चेचा विषय झाला आहे. सध्या शिवतारे अजितदादांच्याच पत्नीचा प्रचार करत असून आज सासवडमध्ये महायुतीची सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र, या सभेपुर्वीच शिवतारे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच माघार का घेतली याची कबुली सुद्धा दिली आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पालखीतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मेळावा पार पडणार आहे.(Vijay Shivtare)

या सभेपूर्वी विजय शिवतारे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना मतदारसंघातील विकासाला कशाप्रकारे खिळ घालण्यात आली, कोण-कोणते प्रकल्प उभे राहू शकले नाहीत, याचा पाढाच वाचला. शिवाय, अजित पवारांसाठी नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले म्हणून आपण माघार घेतली अशी कबुली देखील शिवतारे यांनी दिली.

विशेष म्हणजे शिवतारेंचा यापूर्वी माघार या शब्दावर आक्षेप होता. पण आज त्यांनी स्वताच या शब्दाचा वापर करत म्हटले की, मी मनाला मुरड घालत माघार घेतली.

काही दिवसांपूर्वी शिवतारे यांनी बारामतीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.
सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले गेले. त्यामुळे शिवतारे यांनी मारलेली पलटी राज्यभरात सध्या चर्चेचा विषय आहे.

त्यातच एका शिवसैनिकाने सोशल मीडियावर पत्र लिहून शिवतारे यांना खडेबोल सुनावत अनेक प्रश्न विचारत अडचणीत आणले होते.
आता बारामतीमधील साडेपाच लाख पवारविरोधी मतदारांचे काय होणार, आता तुम्हाला अजित पवार उर्मट वाटत नाहीत का? असे अनेक प्रश्न या पत्रात विचारले होते.

दरम्यान, आज आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना शिवतारे म्हणाले, मागील पाच वर्ष वाया गेल्याचा आमचा
राग आहे. पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. विमानतळ, बाजार, पुरंदरमधील आयटी हब अडकलं आहे.

या आयटी हबमुळे (IT Hub) अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या मात्र ती कामे अडकली, असे अनेक प्रश्न
प्रलंबित आहेत. त्यासोबतच जेजुरीसाठी १०० कोटी मिळावेत, अशी मागणी केली होती. ही देखील पूर्ण झाली नाही.
अशा एकूण १३ मागण्या आहेत. ज्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आमचा राग आहे, असे शिवतारे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कौटुंबिक कारणावरुन पत्नीला मारहाण, जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने वार; एकाला अटक

Amol Kolhe On BJP Govt | डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपावर उगारला टीकेचा ‘आसूड’, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकरी…