Vijay Wadettiwar | वडेट्टीवारांमधील विरोधी पक्षनेता जागा झाला! भुजबळांनाच म्हणाले – ‘सत्तेत असून ओबीसींच्या समस्या…’

ADV

मुंबई : Vijay Wadettiwar | राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारविरोधी भूमिका घेत थेट मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनालाच आव्हान दिले आहे. अंबड, जालना येथील सभेत त्यांनी एकेरी भाषेत अतिशय असभ्य भाषेत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर वैयक्तिक टीका केली. यावेळी भुजबळांच्या जोडीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) देखील होते. एक सत्ताधारी कॅबिनेट मंत्री आणि दुसरा राज्याचा विरोधी पक्षनेता अशाप्रकारची वक्तव्य करत असल्याचे पाहून संपूर्ण महाराष्ट्र विचारात पडला आहे. मात्र, आता वडेट्टीवार यांच्यातील विरोधी पक्षनेता जागा झाला असून आता त्यांनी मंत्री भुजबळांना जाब विचारला आहे.

ADV

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट करून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी जालन्यातील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव एल्गार सभेतील भाषणाला आपले समर्थन नसल्याचे म्हटले आहे.

वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपल्या ट्विटमध्ये भुजबळांना सुनावताना म्हटले आहे की, सरकारकडून अनेकांना प्रमाणपत्र देऊन झाले आहेत. सत्तेत असताना समस्या सोडवल्या पाहिजे. सत्तेत असून ओबीसी समाजाच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे.

विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये.
गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल? शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे,
मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले त्याला माझे समर्थन नाही,
असे वडेट्टीवार यांनी या ट्विटमध्ये म्हणत भुजबळांना विरोध दर्शवला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भुजबळांनी सरकार आणि पक्षालाही सुनावले, ‘सरकारने सरकारसारखे वागले पाहिजे…’

वडेट्टीवार यांचे भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्याला समर्थन नाही, म्हणाले – ‘भाजपाचा त्यांच्यावर दबाव…’