नगरमध्ये १ जानेवारीला भिमसैनिकांची विजयस्तंभ अभिवादन रॅली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अहमदनगरमधून विजयस्तंभ अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी शहरातील विविध आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे बोलावण्यात आली होती. १ जानेवारी २०१९ रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे.

विजयस्तंभ दिनानिमित्त प्रशासनाने जे नियोजन केले आहे, त्याला भीमसैनिकांनी सहकार्य करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. भारतभरातून मोठ्या संख्येने भीम सैनिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांच्या पाण्याची, नाश्त्याची व भोजनाची व्यवस्था नगर शहरात करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. चंद्रपूर येथून भन्ते ज्ञानज्योती यांचे पायी धम्म अभियान २६ व २७ डिसेंबरला नगरला येत आहेत. या रॅलीत २५ हजार लोक सहभागी झाले आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था नगरमध्ये केली जाणार आहे. नगर शहरातील सर्व धम्म बांधव व बहुजन बांधवांनी यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे. सर्व भीम सैनिकांनी आपली जबाबदारी स्वत: उचलावी. कोणताही एखादा ग्रुप कमिटी सदस्य असणार नाही, तर प्रत्येक भीमसैनिक हा कमिटीचा सदस्य असणार आहे, असे एकमताने या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीस सुरेश बनसोडे, संजय कांबळे, अशोक गायकवाड, अजय साळवे, किरण दाभाडे, अशोक केदारे, सोमा शिंदे, कौशल गायकवाड, संघराज गायकवाड, सिद्धार्थ आढाव, अमित काळे, नाथा आल्हाट, नाथा भिंगारदिवे, विलास साठे, दीपक लोंढे, विवेक भिंगारदिवे, आकाश निरभवणे, अमर निरभवणे आदींसह आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप नेता असल्याचे सांगताच पोलिसांनी आणखी चोपले

बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी असे आवाहन केले आहे की, मोठ्या संख्येने १ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. मार्केट यार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यानंतर बसस्थानक चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीस प्रारंभ केला जाईल. तरी हजारोंच्या संख्येने या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.