आश्चर्यकारक ! फक्त 13 इंटरनॅशनल मॅचेस खेळणारे राठोड आता विराट-रोहितला बॅटिंग शिकवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता सपोर्ट स्टाफची निवड लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय संघाने 22 ऑगस्ट हि तारीख नक्की केली होती. त्यानंतर काल निवड समितीने या नावांची शिफारस बीसीसीआयला केली असून या नावांची निवड नक्की समजली जात आहे. क्रिकेट सल्लागार समितीने देखील याची परवानगी मागितली होती, मात्र त्यांची हि परवानगी फेटाळण्यात आली होती त्यामुळे निवड समिती या सपोर्ट स्टाफची निवड करणार होते.

यासाठी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांना याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने काल बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर केला असून विक्रम राठोड यांना फलंदाजी सहाय्यक पदासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर भरत अरुण आणि आर. श्रीधर यांना आपले स्थान टिकवून ठेवण्यात यश आले असून त्यांनी आपले गोलंदाजी आणि प्रशिक्षक पद टिकवून ठेवले आहे. या पदांसाठी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तीन जणांची शिफारस केली होती. त्यानुसार प्रथम क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले असून त्यानुसार विक्रम राठोड यांची निवड करण्यात आली.

कोण आहेत विक्रम राठोड

बॅटिंग कोचच्या पदासाठी इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट, अमोल मुझूमदार, ऋषिकेश काणेटकर, प्रवीण आम्रे, लालचंद राजपूत, तिलन समरावीरा मार्क रामप्रकाश आणि विक्रम राठोड यांनी अर्ज केले आहे. यामध्ये विक्रम राठोड यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी भारतासाठी 6 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले असून त्यांना प्रथमश्रेणी सामन्यांचा खूप मोठा अनुभव आहे. ते 2012 ते 2013 या कालावधीत भारतीय निवड समितीचे सदस्य देखील होते.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like