Vilas Ujawane | अभिनेते डॉ. विलास उजवणेंची ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पोस्ट शेअर करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे डॉ. विलास उजवणे (Vilas Ujawane) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःची अशी एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. आता डॉ. विलास उजवणे (Vilas Ujawane) यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून त्यांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन करत पोस्ट शेअर केली आहे.

 

डॉ. विलास उजवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. या आजारात त्यांनी स्वतःची जमा पुंजी संपूर्ण खर्च केली आहे, तर आता पुन्हा त्यांना हृदयाचा दुर्मीळ आजार झाला आहे आणि त्यातच त्यांना कावीळदेखील झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पुढच्या उपचारांसाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत दिली आहे.

 

राजू कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत डॉ. विलास उजवणे यांना चांगल्या स्वास्थ्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर त्यांच्या बँकेचे डिटेल्सही त्यांनी पोस्टमध्ये शेअर केली आहे.
आजपर्यंत डॉ. विलास उजवणे (Vilas Ujawane) यांनी मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 

Web Title :- Vilas Ujawane | marathi actors vilas ujvane battle with serious illness facebook post viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Chinchwad Police | चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना केले ‘या’ विभागाशी संलग्न

IND Vs BAN Test | बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या 15 इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक

Pune Crime | पत्नी अन् तिच्या कुटुंबाच्या त्रासाला वैतागून पतीची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर FIR; मुंढवा परिसरातील घटना