Coronavirus : ‘कोरोना’पासून बचावासाठी गावातील मुलांसह वृध्द आणि जवानांनी केलं ‘मुंडन’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – झारखंडमधील खेड्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एक अनोखा मार्ग सापडला आहे. मुस्लिम समुदायाच्या जामताडा येथील नाला ब्लॉकच्या कास्ता गावात महिला सोडून इतर सर्वजणांनी आपले मुंडन करवून घेतले आहेत. याचे कारण म्हणजे कोरोना.

खरं तर, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी, या मुस्लिम समाजातील खेड्यातील सर्व पुरुषांनी ब्लेडद्वारे मुंडन केले. सलून आणि पार्लरमध्ये जाऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

सलूनमध्ये वापरलेले कापड आणि न्हाव्याने वापरलेल्या रेझरने किंवा खुर्च्या आणि इतर सामानामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ग्रामस्थांनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आणि त्याचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी आपले मुंडन करण्याचे ठरविले.

जोपर्यंत लॉकडाऊन राहील तोपर्यंत ते खेड्यातच एकमेकांच्या सहकार्याने मुंडण करतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डॉक्टर अरविंद दास म्हणतात की, टॉवेल्स, रेझर सलूनमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंचा वापर सर्व लोकांसाठी होतो, ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, या संक्रमणादरम्यान सलूनमध्ये जाणे धोकादायक आहे. लोकांनी सलून किंवा पार्लरमध्ये जाणे टाळावे.