Vir Das | ‘भारतात दिवसा महिलांची पूजा, रात्री त्यांच्यावर बलात्कार’; कॉमेडियन वीर दासच्या कवितेवरून नवा वाद

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  कॉमेडियन वीर दासने (Vir Das) वॉशिंग्टन डीसीमधील (Washington DC) केनेडी सेंटरमध्ये (Kennedy Center) भारताबद्दल सादर केलेल्या कवितेवरून ( Poem) नवा वाद निर्माण झाला आहे. ‘टू इंडियन्स’ (Two Indians)असे या कवितेचे शीर्षक आहे. या कवितेमध्ये कॉमेडियन वीर दासने (Vir Das) भारताच्या दोन विविध रुपांचं वर्णन केलं आहे. या कवितेतील काही ओळींवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

हा व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केल्यानंतर वीर दासने (Vir Das) भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
या कवितेमधील “मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो,” या ओळींवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

 

वीर दासचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तसेच वीर दास यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि भाजप-महाराष्ट्राचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. आशुतोष जे दुबे (Add. Ashutosh J. Dubey)
यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून वीर दासविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची प्रत शेअर केली आहे.

 

Web Title : Vir Das | comedian vir das brutally trolled for his monologue about two indians at kennedy center Washington DC

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indrani Balan Foundation | पुनित बालन ग्रुप, विस्डम क्रिकेट अकादमी संघांची विजयी घौडदौड कायम !

Pune-Pimpri-Baramati Rickshaw Fare Hike | 22 नोव्हेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ ! पहिल्या दीड कि.मी.साठी 21 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 14 रुपये भाडेदर

TATA Power Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! टाटा पाॅवरमध्ये लवकरच भरती; पगार 3 लाखांपर्यंत, जाणून घ्या

Rajkummar Rao Reception | राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर; पाहा लग्नानंतरच्या स्टार जोडप्याचा पहिला फोटो

Urfi javed | नेटच्या कपड्यांमुळे उर्फी जावेदची काळी ब्रालेट झाली फ्लाॅन्ट, पाहा उर्फीचे हाॅट फोटो