‘त्या’ गोष्टीमुळे रणवीर होतोय ट्रोल, कामवाली बाईही झाली परेशान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमीच रणवीर सिंग त्याच्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे चर्चेत असतो. अनेकदा त्याचे कौतुक होते ,तर अनेकदा त्यावर आक्षेप घेतला जातो. तसेच सध्या ‘गली बॉय’ मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सध्या रणवीर सिंग ‘गली बॉय’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण या प्रमोशन दरम्यानचा रणवीरचा अतरंगी अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दीपिका के घर पर काम करनेवाली बाई अलग से परेशान है , बोलती है, घर में एक कपडा तक नही है, पोछ्या लागने के लिए, अशा आशयाचे त्याच्या चित्र-विचित्र स्टाईलवरचे अनेक मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत. ‘गली बॉय’ च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये रणवीर ज्याप्रकारचे अतरंगी कपडे घालून दिसतोय, त्यावरून त्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. त्यामध्ये बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये रणवीरचा वेगळाच अंदाज दिसला. या इव्हेंटमधील त्याच्या कपड्यांनी, स्टाईलनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

मग काय, ‘गली बॉय’ ऐवजी रणवीरचीच चर्चा रंगली. साहजिकच नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीलाही पंख फुटलेत. त्याच्यावरचे फनी मीम्स पाहून, तुम्हीही या कल्पनाशक्तीची दाद द्याल. तेव्हा बघून तुम्ही पोटभर असणार आहे. ‘अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे.