‘नियोजित’ तारखेच्या 7 दिवसांपुर्वीच झाला मुलीचा ‘जन्म’, डॉक्टरनं रडावं म्हणून मारलं तर रागानं ‘वटारले’ डोळे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्राझीलच्या रियो दि जानेरो शहरात चकित करणारी घटना घडली आहे. इथल्या हॉस्पिटलमध्ये एका मुलीचा जन्म झाला. यानंतर, जेव्हा डॉक्टरांनी तिला सामान्य प्रक्रियेअंतर्गत रडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या लहान जिवाने असे काही केले ज्यामुळे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडले. त्यांनतर आता बाळाचा फोटो व्हायरल होत आहे.

ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथील डायनी डी जिसस ही महिला गर्भवती होती. एका बाळाला जन्म देण्यासाठी ती इतकी उत्सुक होती की तिने हा क्षण टिपण्यासाठी एका वैयक्तिक छायाचित्रकार रॉड्रिगो कुंट्समनचीही नेमणूक केली. 13 फेब्रुवारी रोजी डायनीला मुलाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डायनीने एका मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव इजाबेला पेरीरा डी जिसस असे ठेवले गेले. तिच्या जन्मानंतर लगेचच डॉक्टरांनी मुलीला रडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक, डॉक्टर जन्मानंतर मुलांना रडवतात. या प्रक्रियेअंतर्गत ते मूल निरोगी आहे आणि त्याचे फुफ्फुस चांगले आहेत की नाही याची तपासणी करतात.

जेव्हा डॉक्टरांनी मुलीला रडवण्यासाठी मारले तेव्हा त्या मुलीने रडण्याऐवजी रागाने डॉक्टरांकडे पाहण्यास सुरुवात केली. तिच्या या प्रतिक्रियेने सर्वांना चकित केले. यावेळी तेथे उपस्थित छायाचित्रकाराने त्यांचे छायाचित्र काढले. यानंतर, नाभीसंबधीचा दोर कापला असता मुलीने रडायला सुरुवात केली.

दरम्यान, सोशल मीडियावर या बाळाचे फोटो जोरदार व्हायरल होत आहे. इजाबेल डि जीसस जन्म ठराविक तारखेच्या 7 दिवस अगोदर झाला होता. छायाचित्रकार रॉड्रिगो कंट्समैन यांनी आपल्या फेसबुक अकाउंटमध्ये जन्मलेल्या मुलाचे हे फोटो शेअर केले आहेत. लोकांनी हे फोटो फार आवडले आहे.

You might also like