खा. ‘नुसरत जहाँ’नी ‘अशी’ साजरी केली ‘करवा चौथ’, पती निखिलची आरती करत सोडलं व्रत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात करवाचौथ धुमधाममध्ये साजरी केली जाते. सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. रात्री चंद्राचं दर्शन घेऊन हे व्रत सोडतात. लग्नानंतर नेहमची वादात सापडणाऱ्या टीएमसी खासदार अभिनेत्री नुसरत जहाँ यांनीही आपलं पहिलं व्रत ठेवलं होतं. नुसरत यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत व्रत सोडतानाचे फोटो शेअर केले आहेत.

फोटोत दिसत आहे की, नुसरत आपल्या पतीची आरती करत आहेत. एका फोटोत नुसरत हातात चाळणी घेऊन पती निखीलचा फोटो पहात आहेत. दुसऱ्या फोटोत निखिल त्यांना आपल्या हाताने पाणी पाजत आहेत आणि व्रत सोडत आहेत. सर्व विधी करत नुसरत करवाचौथचं व्रत सोडत आहेत. यात त्यानी लाल रंगाची साडी घातल्याचे दिसत आहे. त्यात त्या खूपच सुंदर दिसत आहेत.
Nusrat Jahan

नुसरत लग्नानंतर अनेकदा कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर आल्या आहेत. लग्नानंतर त्या सिंदूर लावत आहेत. हिंदू सण उत्सव साजरा करत आहेत. त्यांच्याविरोधात अनेक फतवे जारी करण्यात आले आहेत. त्यांनी दुर्गा पूजेचा उत्सवदेखील साजरा केला होता. यानंतर देवबंद उलेमा यांनी नुसरत यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

View this post on Instagram

Simplicity is the ultimate sophistication… #DurgaPuja2019

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

View this post on Instagram

Navami Nites with @nikhiljain09 😍#firstdurgapuja

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

Visit : policenama.com

You might also like