कॅप्टन विराट कोहलीच्या शब्दामुळे महेंद्रसिंह धोनीने बदलला त्याचा ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप संपल्यानंतर लगेच महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात जोर धरत होत्या. मात्र धोनीने याबाबत अद्याप कसलाही खुलासा केलेला नाही. त्याचबरोबर त्याच्या मॅनेजरने देखील धोनी लगेच निवृत्त होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या धोनी दोन महिन्याच्या सुट्टीवर असून तो भारतीय लष्करात सेवा बजावणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमधून अशी माहिती मिळाली आहे कि, महेंद्रसिंग धोनी हा वर्ल्डकपच्या दरम्यानच निवृत्ती स्वीकारणार होता. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली याने त्याला आपला हा निर्णय बदलायला लावल्याची माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे. विराट कोहलीला महेंद्रसिंग धोनीने इतक्यात आपला साथ सोडावी असे वाटत नव्हते. या रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार कोहलीच्या सल्ल्यानंतरच धोनीने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. कर्णधार कोहलीला धोनीच्या फिटनेसवरून काहीही चिंता नसून तो पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत खेळणार आहे.

याचबरोबर रिपोर्टमध्ये असा देखील खुलासा करण्यात आला आहे कि, धोनीने आपल्या निवृत्तीविषयी संघातील खेळाडूंची देखील चर्चा केली होती. त्याचबरोबर आयपीएलमधील आपल्या चेन्नई सुपर किंग्स मधील अधिकाऱ्यांशी देखील या विषयावर चर्चा केली होती. धोनीच्या जागी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती पंतला तयार करत आहेत. त्याचबरोबर तो या स्थानासाठी योग्य आहे कि नाही याची देखील चाचणी करत आहेत. मात्र जर तो जखमी झाला तर त्याच्याजागी धोनीइतका सक्षम खेळाडू सध्या कुणीही नसल्याने धोनीला सध्या या स्थानासाठी तयार राहावे लागणार आहे. त्याचबरोबर संघ व्यवस्थापन टी -२० वर्ल्डकपच्या दृष्टीने पंतला तयार करत असून धोनीदेखील या संघात त्यांना हवा आहे. त्यामुळे तो पंतला मार्गदर्शनाबरोबरच खेळात मदत देखील करू शकेल.

दरम्यान, पुढील वर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप पर्यंत धोनीला भारतीय संघाबरोबर राहण्याची विनंती करणार आहेत. त्यामुळे आता धोनी काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त