युरोपीयन चॅम्पियन लीग : विराटच्या ‘शापा’मुळे ‘त्या’ फुटबॉल टीमचा पराभव ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युरोपीयन चॅम्पियन लीगचा अंतिम सामना काल पार पडला. या सामन्यात टॉटनहॅमला २-० ने पराभूत करत लिव्हरपूलनं सहाव्यांदा विजेतेपद पटकावलं.त्यांच्या या विजयात मोहम्मद सलाह आणि डिवॉक ओरिगी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. मात्र या सगळ्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ट्रोल होत आहे. यामागचे कारण देखील तितकेच मजेदार आहे.
या विजयापेक्षा जास्त चर्चा सध्या सोशल मीडियावर विराटमुळे टॉटनहॅमचा पराभव झाल्याची चर्चा होत आहे.

विराटचा शाप लागला आणि संघाला पराभव पत्करावा लागला अशी ट्विट्स केली जात आहेत.त्यामुळे विराट कोहली विश्वकप स्पर्धा सुरु होण्याच्या आधीच चर्चेत येऊ लागला आहे. मात्र त्याचबरोबर नेटिझन्सच्या या लॉजिकने सर्वांना चकित केलं आहे. यामागे कारण असे आहे कि, एक आठवड्यापूर्वी विराट कोहलीने इंग्लिश फुटबॉलपटू हॅरि केनची मैदानावर भेट घेतली होती. त्याचा फोटो केननं ट्विटरवर शेअर केला होता.त्यानंतर काल झालेल्या सामन्यानंतर हा फोटो टाकून लोकांनी विराट कोहलीला ट्रोल करण्यास सुरु केले.

दरम्यान, या सगळ्यात विराट कोहलीला ट्रोल करण्यासाठी आणखी एक कारण आहे ते म्हणजे मागील वर्षी कोहलीने जर्मनीची जर्सी घालून फोटो पोस्ट केला होता. तेव्हा जर्मनीला दक्षिण कोरियाविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे चाहत्यांनी दोन्ही वेळा त्याला या प्रकरणाशी जोडत ट्रोल केले आहे. युरोपीयन चॅम्पियन लीगमध्ये लिव्हरपूलने याआधी १९७७, १९७८, १९८१, १९८४ आणि २००५ मध्ये विजय मिळवला होता.टॉटनहॅमला या स्पर्धेत आजपर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.