Virat Kohli | विराट २०२७ला वर्ल्ड कप जिंकणार! २०१६ साली ज्योतिषाने वर्तवलेली भविष्यवाणी आतापर्यंत ठरलेय खरी

मुंबई : Virat Kohli | वन डे वर्ल्ड कपच्या (ODI World Cup 2023) अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला, यानंतर क्रिकेटप्रेमी अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. विराटला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत चाहत्यांना आहे. मात्र २०२७ला विराट वर्ल्ड कप (World Cup 2027) जिंकणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विराट (Virat Kohli) २०२७ वर्ल्ड कप जिंकणार असल्याची भविष्यवाणी २०१६मध्येच झाली होती. त्यामुळे चाहत्यांची आशा वाढली आहे. भारताच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर फेसबूकची २०१६सालची एका ज्योतिषाची या संदर्भातील पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

सध्या विराट कोहली ३५ वर्षांचा असून पुढील वर्ल्ड कपला खेळेल का, हा मुख्य प्रश्न आहे. विराटची फिटनेस पाहता तो २०२७मध्ये वर्ल्ड कप खेळेल आणि जिंकेलही अशी भविष्यवाणी एका ज्योतिषाने २०१६ मध्ये फेसबुकवर केली आहे. स्टार अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रॉलॉजी (Star & Astrology) नावाच्या पेजवरून ही पोस्ट करण्यात आली होती. ती आता व्हायरल झाली आहे.

विराट (Virat Kohli) बाबत या फेसबुक पेजवरील भविष्यात म्हटले आहे की, विराट २०१६ आणि २०१७ मध्ये मोठे स्टारडम मिळवेल. त्याचे क्रिकेट कौशल्य सर्वांना प्रभावित करेल. शनी जानेवारी २०१७ मध्ये वृश्चिक राशीतून बाहेर पडत असल्याने २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये त्याचे यश आणखी मोठे होईल.

विराटच्या लग्नाची चर्चा मार्च अथवा एप्रिल २०१७ मध्ये सुरू होईल आणि २०१७ च्या अखेरीस आणि २०१८च्या सुरुवातीला तो लग्नगाठ बांधेल.
मी क्रिस्टल बॉलकडे पाहिले तर डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ मध्ये लग्नासाठी खूप अनुकूल आहेत.

लग्नानंतर त्याला इंडोअर्समेंटमधून उत्पन्न मिळेल. फेब्रुवारी २०१८ ते सप्टेंबर २०२० दरम्यान अपत्यप्राप्ती होईल.
सप्टेंबर २०२० ते २०२१ दरम्यान त्याची कामगिरी फार उत्तम होणार नाही.
विराट सप्टेबर २०२१-२०२५ दरम्यान व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या यशासह जोरदार पुनरागमन करेल.
विराटला २०२१-२०२४ दरम्यान आणखी एक बाळ होण्याची संधी आहे.

विराटची कारकीर्द ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत अर्धवट गडगडेल.
विराटच्या कारकिर्दीला २०२७ मध्ये पुन्हा उभारी येईल आणि तो मार्च २०२८ पूर्वी खूप मोठ्या यशासह तो निवृत्त होईल.
यामध्ये खुप मोठ्या यशासह म्हणजे विश्वचषक असे मानले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दमदाटी करुन तरुणाला मारहाण, कोयता हवेत फिरवून पसरवली दहशत; विश्रांतवाडी परिसरातील घटना, एकाला अटक