Virender Sehwag : वीरूनं शेअर केला भन्नाट व्हिडीओ ! म्हणाला- ‘बिवी की लाठी…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टीव्ह असतो. अनकेदा तो काही पोस्ट शेअर करत असतो ज्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. पुन्हा एकदा त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या जोरदार चर्चेत असल्याचं दिसत आहे.

सेहवागनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा एक विनोदी व्हिडीओ आहे. व्हिडीओत दिसत आहे की, एका गावात पार्टी सुरू आहे. त्यात एक वयस्कर माणूस तरुणांसोबत डान्स करत आहे. डान्स करताना तो माणूस अचानक घाबरून पळ काढताना दिसतो. नंतर व्हिडीओत दिसतं की, एक म्हातारी हातात काठी घेऊन आलेली असते. तिला पाहूनच तो माणूस पळ काढतो. ती म्हातारीही त्याच्या मागे धावते.

व्हिडीओ शेअर करताना सेहवाग म्हणतो, वय हे सारखं बदल असतं. परंतु बायकोनं उगारलेली काठी (बिवी की लाठी) ही कायमच धडकी भरवणारी असते. सोबतच त्यानं काही हॅशटॅगही वापरले आहेत.

सेहवागनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.