Virginity | ‘व्हर्जिनिटी’ (कौमार्य) गमावण्याला दिले गेले नवीन नाव, जगात सुरू झाली ‘चर्चा’ !

नवी दिल्ली : Virginity | ’व्हर्जिनिटी’ म्हणजेच कौमार्य हा शब्द मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. व्हर्जिनिटी टेस्ट (Virginity Test) रोखण्याची मागणी केल्यानंतर आता काही लोक हा शब्द बदलण्याची मागणी करत आहेत.

’व्हर्जिनिटी’ऐवजी ’सेक्शुअल डेब्यू’
टोरंटोच्या प्रसिद्ध लेखिका निकोल हॉजेस ’व्हर्जिनिटी’ऐवजी ’सेक्शुअल डेब्यू’ शब्दाचा वापर करण्याची मागणी करत आहेत. हॉजेस यांनी बीबीसीला सांगितले की, आपण अजूनही व्हर्जिनिटीसारख्या (Virginity) जुन्या शब्दाचा वापर करतो, जो काळाच्या ओघात बदलण्याची आवश्यकता आहे.

व्हर्जिनिटीची संकल्पना सुद्धा जुनी
हॉजेस यांच्यानुसार, व्हर्जिनिटी शब्द केवळ जूना झाला आहे म्हणून बदलण्याची गरज आहे असे नाही तर व्हर्जिनिटीची संकल्पना सुद्धा जुनी झाली आहे आणि त्याचे कोणतेही अस्तित्व नाही.

नाव बदलण्यासाठी कॅम्पेन
कारण सेक्शुअल जर्नी कधीही संपत नाही. त्याऐवजी सेक्शुअल डेब्यू शब्द योग्य आहे. हॉजेस यांनी आपल्या नवीन पुस्तकात सुद्धा या शब्दाचा वापर प्रत्येक ठिकाणी केला आहे. हॉजेसने यासाठी एक कॅम्पेन सुरू केले आहे.

शब्द रिब्रँड करण्याची वेळ
मागच्या वर्षी एक ट्विट करून हॉजेस यांनी लिहिले होते की, व्हर्जिनिटी शब्द रिब्रँड करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून महिला तो एखाद्या कमतरतेप्रमाणे घेऊ नयेत. व्हर्जिनिटीमुळे असे वाटते की तुम्ही काहीतरी गमावले आहे. आता आपण एक नवीन युगात आहोत.

Pune Crime | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणार्‍या आणखी एका बुकीचा ‘पर्दाफाश’; धनकवडीत कारवाई

होजेस यांच्या मताशी काहीजण असहमत

परंतु येथे अजूनही व्हर्जिनिटी गमावणे लाजिरवाणे समजले जाते. हे बदलण्याची गरज आहे. व्हर्जिनिटीला सेलिब्रेशनप्रमाणे घेतले पाहिजे.
मात्र, काही तज्ज्ञ हॉजेस यांच्या म्हणण्याशी सहमत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे सेक्स करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल.

पार्टनरची बरोबरीची भागीदारी आवश्यक

कॅलिफोर्नियाच्या सेक्स एज्युकेटर ज्यूलिया फेल्डमन यांचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्ही व्हर्जिनिटी किंवा सेक्शुअल डेब्यूसारख्या शब्दाचा वापर करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सेक्शुएलिटीबाबत सांगता.
सेक्स समाधानाचा अनुभव मिळवण्यासाठी पार्टनरची बरोबरीची भागीदारी आवश्यक आहे.

गैरसमजातून बाहेर पडा

मात्र, व्हर्जिनिटी शब्दावर आणखी काम करण्याची गरज आहे. आपल्याला केवळ एकदा सेक्स केल्यानंतर व्हर्जिनिटी गमावल्याच्या समजातून बाहेर पडण्याची गरज आहे.

हे देखील वाचा

Kolhapur Crime | शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला 4 वर्षाची शिक्षा,10 हजारांचा दंड

Pune Crime | बेपत्ता तरुण बिल्डरचा विहिरीत आढळला मृतदेह, खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप; परिसरात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Virginity | virginity rebranding debut word writer feminist scholars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update