Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

0
132
Vistadome Coach | Huge response to Vistadom Coach on Central Railway! 20,407 passengers recorded in last 3 months, revenue Rs.2.38 crore
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य रेल्वेवरील (Central Railway) व्हिस्टाडोम डब्यांना (Vistadome Coach) प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुंबई-गोवा मार्गावरील (Mumbai Goa Route) दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील (Mumbai Pune Route) पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये असोत, काचेचे पारदर्शक छत आणि रुंद खिडक्यांसह हे डबे लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. (Vistadome Coach)

 

ऑक्‍टोबर ते डिसेंबर-2021 या कालावधीत मध्य रेल्वेने 20,407 प्रवाशांची नोंद करून रु.2.38 कोटीचे उत्पन्न मिळविले आहे.
मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस 100% म्हणजेच 7,754 प्रवाशांची नोंद करीत रु. 1.40 कोटी कमाईसह सर्वात पुढे आहे. मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस 90.43% म्हणजेच 7,185 प्रवाशांच्या नोंदीसह रु.50.96 लाख कमाईसह मागे आहे त्यापाठोपाठ डेक्कन क्वीन 5,468 प्रवाशी नोंदीसह रु.46.30 लाख उत्पन्न मिळविले आहे. डेक्कन क्वीन पुणे ते मुंबई 94.28% बुकिंगसह अप दिशेला अधिक लोकप्रिय आहे.

 

2018 मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये (Mumbai Madgaon Jan Shatabdi Express)विस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडण्यात आला. या डब्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे अशाप्रकारचा डबा 26.6.2021 पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये (MUmbai-Pune Deccan Express) जोडण्यात आला. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई-पुणे मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच 15.8.2021 पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला.

विस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या (Vistadome Coach) पारदर्शक छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोगे आसन आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे यांसारखी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी व व्ह्यूइंग गॅलरी देखील आहे.

 

डेक्कन क्वीनमधील व्हिस्टाडोम कोचचे (Deccan Queen Vistadome) नूतनीकरण आणि सजावट मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपने केली आहे.
विस्टाडोम डब्यांनी पर्यटनाला चालना दिली आहे आणि भारतीय रेल्वेवरील लक्झरी प्रवासाच्या संकल्पनेत क्रांती घडवून आणली आहे.

 

Web Title :- Vistadome Coach | Huge response to Vistadom Coach on Central Railway! 20,407 passengers recorded in last 3 months, revenue Rs.2.38 crore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | ‘न्यूड डान्स’, मित्रांकडून ‘गँगरेप’, ‘अनैसर्गिक संभोग’ अन् ‘प्रायव्हेट पार्ट’वर दिले सिगरेटचे चटके… बिल्डरनं पत्नीला दिल्या ‘नरकयातना’

 

PMPML | पीएमपीएमएलचा मोठा निर्णय ! बसमधून प्रवास करण्यापूर्वी दाखवावे लागेल संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र; अन्यथा…

 

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या