PMPML | पीएमपीएमएलचा मोठा निर्णय ! बसमधून प्रवास करण्यापूर्वी दाखवावे लागेल संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र; अन्यथा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) कडक निर्बंध (Strict Restriction) लागू केले आहेत. पुणे शहरात (Pune Corona) मागिल काही दिवसांपासून पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यसाठी लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. अनेक ठिकाणी लसीचे दोन डोस (Two Doses) बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) बसमधून प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारक केले आहे. पीएमपीएमएल (PMPML) कडून या नियमाची सोमवारपासून (दि.17) अंमलबजावणी केली जाणार आहे.

 

 

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी कार्यालये, मॉल्स, थिएटर, नाट्यगृह आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता पीएमपीएमएल ने (PMPML) देखील आपल्या नियमावलीत बदल केला आहे. यानुसार दोन डोस घेतल्यांनाच बसने प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना बसमधून प्रवास करताना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र (Certificate) किंवा युनिव्हर्सल पास (Universal Pass) दाखवणं बंधनकारक करण्यात आले आहे. सोमवारपासून हा बदल लागू होणार आहे.

 

 

नवीन नियमावलीचे पत्रक पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील सर्व पीएमपीएमएल बस स्थानकांना (PMPML Bus Stop) पाठवण्यात आले आहे. लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार केले जाणार आहे. वारंवार नियम मोडून विना लसीकरण प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पीएमपीएमएल कडून सांगण्यात आले आहे.

 

 

Web Title :- PMPML | complete vaccination required for pmpml travel in pune and pimpri chinchwad city otherwise corona covid-19 news

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

 

Corona in Mumbai | मुंबईकरांना मोठा दिलासा ! नव्या बाधितांच्या तुलनेत ‘कोरोना’मुक्त होणार्‍यांची संख्या तिप्पट

 

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या