Vivek Oberoi | ऐश्वर्या राय आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल अखेर विवेकने केला ‘हा’ मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या ‘धारावी बँक’ या वेब सिरीजमुळे अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आता विवेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपली जादू दाखवत आहे. या वेब सिरीजमध्ये विवेक सोबत सुनील शेट्टी देखील मुख्य भूमिकेत आहे. विवेक (Vivek Oberoi) अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलताना दिसतो. मात्र अलीकडेच त्याने त्याच्या व्यावसायिक आयुष्या सोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल ही बोलताना दिसला. आता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.

सुरुवातीच्या काळात सलमान खान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय विवेक ओबेरॉयला डेट करत असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. आता याबद्दल खुलासा खुद विवेक ओबेरॉयने केला आहे. 2003 मध्ये विवेक ऐश्वर्या वेगळे झाले. या मागे अनेक गोष्टींवर चर्चा झाली होती. तर आता खुद विवेकने यावर मौन सोडले आहे.

एका मुलाखतीत विवेक ओबेरॉयला (Vivek Oberoi) त्यांच्या या नात्याबद्दल विचारण्यात आले.
यावेळी तो म्हणाला, “ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्यावर बोलण्यात काय अर्थ नाही.
कारण जर तुमच्या वैयक्तिक आयुष्या बाबत कोणी बोलू नये असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही
तितके संवेदनशील असाल तर स्वतःच्या बाबतीत ही बोलणे टाळावे.
जेव्हा माझे ब्रेकअप झाले तेव्हा माझ्या वैयक्तिक आयुष्यात ही मला खूप मोठा धक्का बसला होता.
अनेक महिने मला कोणतेही काम मिळाले नव्हते. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो.
इतकाच नाही तर मी आत्महत्या करण्याचा निर्णय देखील घेतला होता.
मात्र माझ्या या संपूर्ण प्रवासात माझी पत्नी प्रियांका आणि आईचा खूप पाठिंबा मिळाला.
म्हणून मी आज त्या परिस्थितीमधून बाहेर पडू शकलो” असे तो म्हणाला.

Web Title :- Vivek Oberoi | vivek oberoi briefly commented on his past relationship with ex-girlfriend aishwarya rai bachchan

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Harshvardhan Rane | ‘राम लीला’ सिनेमासाठी रणवीर सिंह नाही तर ‘हा’ अभिनेता होता पहिली पसंत

Sushma Andhare | ‘मी पक्षाने सांगितले, तर राजीनामा देण्यास तयार आहे, पण…’ – सुषमा अंधारे