Vi युझर्सना मोठा धक्का ! महाराष्ट्रासह 4 राज्यात ‘हे’ प्लॅन महागले, जाणून घ्या नवी किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्होडाफोन-आयडिया (Vi) या कंपनीने आपल्या युझर्सना मोठा धक्का दिलाय. या कंपनीने पोस्टपेड प्लॅनची किंमत वाढविली आहे. महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांत Vi चे प्लॅन महागलेत. सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील पूर्व सर्कलमध्ये प्लॅनची किंमत वाढवली. त्यानंतर आता चेन्नई, कोलकाता, महाराष्ट्र व गोवा या टेलिकॉम सर्कलमधील प्लॅनची किंमत वाढविली आहे.

Vi 598 Plan व Vi 699 Plan प्लॅनच्या किंमतीत वाढ झालीय. तामिळनाडू, चेन्नई, कोलकाता, महाराष्ट्र व गोवा टेलिकॉम सर्कलमधील युझर्संना ५९८ रुपये आणि ६९९ रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्ससाठी यानंतर अनुक्रमे ६४९ रुपये आणि ७९९ रुपये मोजावे करावे लागणार आहे. म्हणजे ५९८ रुपयांचा प्लॅन ५१ रुपयांनी आणि ६९९ रुपयांची प्लॅन १०० रुपयांनी महागला आहे.

जाणून घ्या, Vi चा ७९९ रुपयांचा प्लॅन
Vi च्या या प्लॅनमध्ये युझर्सना तीन कनेक्शन ऑफर केली जात आहेत. एक प्रायमरी व दोन सेकंडरी कनेक्शनचा याचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये एकूण १२० जीबी डेटा युझर्सला दिला जात आहे. प्रायमरी युझरसाठी ६० जीबी डेटा व प्रत्येक सेकंडरी युझरला ३० जीबी डेटा ऑफरद्वारे दिला जातोय. या प्लॅनमध्ये डेटा रोलओवर केला जात आहे. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग व प्रत्येक कनेक्शनच्या युझरला प्रतिमहिना १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत.

जाणून घ्या, Vi चा ६४९ रुपयांचा प्लॅन
Vi च्या या प्लॅनमध्ये युझर्सना दोन कनेक्शन ऑफर करतात. यात एक प्रायमरी आणि एक सेकंडरी कनेक्शन याचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये एकूण ८० जीबी डेटा दिला जात आहे. प्रायमरी युझरला ५० जीबी व सेकंडरी युझरला ३० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्रायमरी युझर २०० जीबीपर्यंत, तर सेकंडरी युझर ५० जीबीपर्यंत डेटा कॅरी फॉरवर्ड करता येईल. या डेटाशिवाय अन्य बेनिफिट्समध्ये दोन्ही कनेक्शन युझर्सला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग व प्रतिमहिना १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत.