खुशखबर ! ‘इन्कम टॅक्स’मध्ये सवलत हवी तर पोस्टात ‘हे’ खाते उघडा, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पोस्टात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहते. त्यामुळे पोस्टाकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. पोस्टात केलेल्या छोट्या छोट्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा मिळतो. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी एफडी हा चांगला पर्याय आहे. बँकेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला १२ वर्षानंतर दामदुप्पट रक्कम मिळते. तर एसबीआयच्या ५ ते १० वर्षाच्या कालावधीसाठी पैसे गुंतवल्यास ६.९ टक्क्यांपासून ७.७ टक्क्यापर्यंत व्याज मिळते.

बँकेत १ लाख रुपये गुंतवल्यास १२ वर्षांनी तुम्हाला २ लाख रुपये मिळतात. परंतु पोस्टात पैसे गुंतवल्यास कमी कालावधीमध्ये तुम्हाला दुप्पट पैसे मिळतात. पोस्टात १० वर्षात दामदुप्पट रक्कम मिळते. पोस्टामध्ये टाइम डिपॉझिटचा पर्य़ाय आहे. पाच वर्षानंतर पुन्हा त्या योजनेत पैसे गुंतवता येतात. १० वर्षांनी दुप्पटहून अधिक परतवा तुम्हाला मिळतो.

पोस्टामध्ये तुम्हाला चार प्रकारे पैसे गुंतवता येतात. एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षेसाठी गुंतवणूक करता येते. पोस्टात एका वर्षासाठी पैसे गुंतवल्यास ६.९ तर दोन वर्षासाठी रक्कम गुंतवल्यास ७.२ टक्के व्याज मिळते. तीन वर्षासाठी पैसे गुंतवल्यास ७.४ टक्के व्याज मिळते शिवाय पाच वर्षे पैसे गुंतवल्यास ७.७ टक्के व्याज मिळते आणि प्राप्तीकर कायद्यातील कलम ८० सी अंतर्गत सुट मिळते.

खात्याची खास वैशिष्ट्ये

पोस्टातील एफडी खाते २०० रुपयांपासून सुरु करता येते. यामध्ये कमीत कमी ५०० रुपये बॅलन्स ठेवावा लागतो. पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनेतून मिळणारे १० हजार रुपयांपर्यंतचे व्याजावर कोणताही कर लावला जात नाही. तसेच हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये वळते करता येते.

कसे उघडायचे ‘एफडी’ खाते

पोस्ट ऑफिसमध्ये एफडीचे खाते उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिसशिवाय इतर साईटवरुन डाऊलोड करता येतो. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी खाते उघडण्यासाठी KYC पूर्ण करावे लागते.

खाते उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रे

पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून मतदान कार्ड, आधार कार्ढ, पासपोर्ट, वाहन परवाना, अ‍ॅड्रेस प्रूफसाठी बँकेचे पासबुक, पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचे बिल, फोन बिल, आधार कार्ड गरजेचे आहे. तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संयुक्त खात्यात इतर खातेदारांचे फोटो असणे आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त