Video : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने पुर्तगालच्या सगळ्यात उंच टेकडीवर केला ‘खतरनाक’ स्टंट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा अपकमिंग अॅक्शन चित्रपट ‘वॉर’ चा टीजर लॉन्च झाला आहे. चाहत्यांना चित्रपटाचा टीजर खूप आवडला आहे. चित्रपटाला घेऊन चाहत्यांमध्ये एक्साइटमेंट वाढली आहे. परंतु या चित्रपटाला घेऊन एक आश्चर्यचकित करणारी बातमी आली आहे. बॉलीवूडचा अॅक्शन स्टार ऋतिक रोशन आणि टाइगर श्रॉफने या चित्रपटाचे काही खतरनाक बाईक स्टंट पुर्तगाल मधील सगळ्यात उंच टेकडी ‘सेरा दा एस्ट्रेला’ वर शूट झाले आहेत. एक सीन शूट करण्यासाठी टायगर आणि ऋतिकला ‘सेरा दा एस्ट्रेला’ वर हाय स्पीडमध्ये सुपर बाईक चालवावी लागली. या गोष्टीचा खुलासा चित्रपटाचे डायरेक्टर सिद्धार्थ आनंदने केला आहे.

https://twitter.com/yrf/status/1150636082742071297

डायरेक्टर सिद्धार्थने सांगितले की, ‘हॉलीवूडच्या अॅक्शन चित्रपटांसारखे या चित्रपटात देखील आश्चर्यचकित करणारे सीन आहेत. टाइगर श्रॉफ आणि ऋतिकने ही सुपर फास्ट बाईक चालवण्यासाठी ट्रैनिंग घेतली आणि चित्रपटाचा सीन एक्सपर्टसच्या देखरेखी खाली केला. ऋतिक रोशन आणि टाइगर श्रॉफच्या व्यतिरिक्त वाणी कपूर या चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपट गांधी जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात इंटरनेशनल लेवलच्या अॅक्शन आहेत.