बाळापुर गावाजवळील महामार्गा समोर लाखो लिटर पाणी वाया

पोलीसनामा ऑनलाइन – सुरत नागपुर महामार्गावरील पारोळा रोड हॉटेल शांतीसागर समोर पाण्याच्या पाईप फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. गेल्या काही दिवसापासून पाईप लाईन गळतीत पारोळा रोड पाईप लाईनीतून दुषित पाणी मिश्रित होऊन नागरीकांच्या घरा पर्यत पोहचेल.या दुषित पाणी पिऊन काही नागरीकांना ञास सहन करावा लागला. यापुर्वी हि पाईप लाईन फुटल्याने अशा प्रकारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरुन नाल्यात वाहून गेले.

एकीकडे शहरात आठ,आठ दिवस पाणी येत नाही.पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागते.दुसरीकडे रस्ते कामातून पाईप लाईन फोडून ठेऊन पाणी गळती नेहमीचीच नागरीकांना डोके दुखी ठरत आहे. पाणी नियोजन नियमीत नसते.यामुळे मनपा कर्मचारी तात्पुरती डागडूजी करतात.हि बाब योग्य नाही.यात अर्थ कारण कारण जडलेले आहे.

आयुक्तही सदर बाबीकडे लक्ष देत नाही. एकीकडे पाणी बचत करावे असे प्रशासन सांगते.वर्षभर पाणी पट्टी वसूली केली.परंतू पाणी कमीच दिवस येते.दुष्काळ जाहिर झाला असून काही दिवसापूर्वी मुख्यमंञ्यांनी धुळ्यात बैठकीत पाणी जपून वापरा अशा अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते.परंतू पाझरा पाञात पाईप लाईन फुटून वाया जाणारे पाणी पाहता.मनपा अधिकारी,कर्मचारी यांनी मुख्यमंञीच्या सूचनेला व आदेशाला जणू केराची टोपलीच दाखवल्याचे दिसते.अशी चर्चा परिसरातून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरीकांनी गळती पाहून भावना प्रकट केल्या.

मनपा कर्मचारीचा टक्केवारीसाठी हलगरजीपणा

पारोळा रोडवर लाखो लिटर वाहून जाणारे पाणी पाहून नागरीकांने संतप्त प्रतिक्रिया दिली कि स्वत:च्या आर्थिक फायदासाठी जल वाहिनीच्या सुयोग्य कामाकडे दुर्लक्ष केले.टक्केवारीसाठी दिखावू काम करण्यात येते.काही महिन्यापुर्वी अशाच पध्दतीने याच ठिकाणी पाईप लाईन फुटली होती. त्यावेळी थारूमातूर कामकाज करण्यात आले होते.परत काल रविवार पहाटे पासून आज अकरा वाजे पर्यत गळती सुरु होती. परत पाईप लाईन फुटल्याने मनपाचा निष्काळजी पणा सिध्द होत आहे.व हे टक्केवारीसाठी केले जाते असे जतिन पाटील यांनी आरोप केला आहे.

ह्याहि बातम्या वाचा

तुमच्या पवार साहेबांनी ‘यांना’ कळा सोसून जन्माला घातले का ? ; ‘या’ नेत्याचे वक्तव्य

सुजय विखे Is in trending पण…

‘ते गांधी सत्याच्या मार्गावर चालायचे हे गांधी खोट्याच्या मार्गावर चालतात’

#BJP : ऑपरेशन ‘अहमदनगर’ सक्सेसनंतर आता भाजपचे ऑपरेशन ‘माढा’ काय आहे OPERATION माढा हे वाचा सविस्तर

शरद पवार यांचे नातू रोहित पवारांचा पार्थ अजित पवारांना सल्ला काय दिला सल्ला हे वाचा सविस्तर