पुण्यातील पाण्याचा प्रश्न सुटला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळ्यामध्ये धरणांमध्ये पाणीसाठा कमी राहील्याने झोन निहाय पाणी कपात करण्यात आली होती. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने ही कपात रद्द करून सर्व भागात व्यवस्थित पाणी पुरवठा पुर्ववत करावा, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आज सर्वसाधारण सभेतच प्रशासनाला दिले.

नगरसेविका वर्षा तापकीर यांनी खडकवासला धरण शंभर टक्के भरले असताना शहराच्या काही भागात अद्यापही पाणी कपात करण्यात येत आहे. प्रशासनाने याचे स्पष्टीकरण करावे, अशी मागणी सर्वसाधारण सभेमध्ये केली. नगरसेविका अश्‍विनी भागवत यांनी धनकवडी भागात मागील वर्षभरापासून वेळी अवेळी आणि कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे यामुळे हाल होत आहेत. धरणांमध्ये बर्‍यापैकी पाणी जमा झाले असून उर्वरीत पावसाळ्यातही आणखी पाणीसाठा वाढण्याची चिन्हे आहेत. यास्तव पालिकेने वडगाव जलकेंद्रातून पाणी पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी केली.

अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव यांनी वडगाव शेरी परिसरात चार दिवसांतून एकदा केवळ अर्धातास आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. निवडून आल्यापासून पाण्याच्या प्रश्‍नावरच भांडावे लागत आहे. भर पावसात आठ दिवस उपोषण आणि आंदोलन करूनही पाण्याचा प्रश्‍न सुटत नाही. उन्हाळ्यामध्ये एकवेळ ठीक होते परंतू आता पावसाळ्यात धरण भरले असताना पाणी पुरवठा होत नाही. प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली. गणेश ढोरे आणि अश्‍विनी पोकळे या नवीन सदस्यांनी नव्याने समाविष्ट केलेल्या ११ गावांमध्ये दहा दिवसांतून एक तास पाणी पुरवठा होतो. याकडे लक्ष वेधताना चोवीस तास पाणी पुरवठा योजनेत ११ गावांचा समावेश करून पाणी पुरवठा योजना राबवावी, अशी मागणी केली.

यावर पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्हि.जी. कुलकर्णी यांनी खडकवासला धरणसाखळीमध्ये सध्या १३.३० टीएमसी अर्थात ४४ टक्के पाणीसाठा आहे. टेमघर धरणाच्या दुरूस्तीमुळे या धरणात पाणी साठविता येत नाही. तेथील सर्व पाणी खडकवाला धरणात येत असल्याने खडकवासला धरण भरले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला धरणसाखळीमध्ये एक टीएमसी पाणी कमी आहे. धरणे शंभर टक्के भरल्याशिवाय पाणी पुरवठा पुर्ववत करता येणार नाही, असे स्पष्टीकरण दिले. यावर महापौर मुक्ता टिळक यांनी खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून अद्याप पावसाळा सुरू आहे. तोपर्यंत उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे झोननिहाय करण्यात आलेली कपात रद्द करून शहरात पाणी पुरवठा पुर्ववत करावा, असे आदेश दिले.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या 

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने