ऐन गणेशोत्सवात पुणे शहरातील ‘या’ भागातील पाणी पुरवठा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऐन गणेशोत्सवामध्ये पुण्यातील काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे महापालिकेकडून करण्यात आले आहे. वारजे आणि लष्कर ते खराडी या जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे निघाल्याने कोथरुड, बावधन, बालेवाडी, पाषाण आणि सूसमधील पाणी पुरवठा गुरुवारी (दि.५) बंद राहणार आहे.

शुक्रवारी (ता.६) उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे. या केंद्राच्या आवारातील आवश्‍यक ती कामे तातडीने करण्यात येणार असून, त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आज (मंगळवार) कळविले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
चांदणी चौक टाकी : उजवी, डावी भुसारी कॉलनी, परमहंस नगर, भूगाव, बावधन, पाषाण-गावठाण, शास्त्रीनगर, सूस टाकी, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे, विधाते वस्ती, मुरकुटे वस्ती, म्हाळुंगे गाव, सूस गाव, सूस रस्ता, मोहनगर आणि परिसर.

आरोग्यविषयक वृत्त –