Waxing At Home | घरी वॅक्सिंग करताना करू नका ‘या’ 5 चुका, नाहीतर तुमची त्वचा होऊ शकते खराब

पोलीसनामा ऑनलाईन टीम | आजकाल प्रत्येकाला सुंदर दिसण्याची खूप इच्छा असते (Waxing At Home). या कारणास्तव अनेकजण चेहऱ्यावर वेगवेगळ्या गोष्टी लावतात. परंतु त्यामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. तसेच हल्ली मुली पार्लरमध्ये जास्त पैसे घालवण्यापेक्षा घरच्या घरी वॅक्सिंग करतात (Waxing Tips). कारण ब्युटी पार्लर मध्ये वॅक्सिंगसाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात (Beauty Tips). परंतु वॅक्सिंग करताना काही चुकांमुळे आपली त्वचा खराब होते. त्यामुळे त्या चुका टाळण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागते (Waxing At Home).

· चुकीच्या वॅक्सिंगमुळे त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. तुमच्या त्वचेवर संसर्ग होण्याचा धोका सुद्धा उद्भवू शकतो.
तुमची त्वचा नाजूक असेल, तर त्वचेवर कोणताही दबाव येणार नाही याची काळजी घ्यावी (Pain While Waxing).

· वॅक्सिंग करताना चुकूनही कोणतेही वॅक्स किंवा जुने झालेले वॅक्स वापरू नका. असे केल्याने, तुमची त्वचा खूप खराब होते.
त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रतीचे वॅक्स वापरावे.

· जेव्हाही तुम्ही वॅक्स करता, तेव्हा प्रथम ते इतर ठिकाणी थोडं लावून बघणे. याला पॅच टेस्ट म्हणतात.
ही टेस्ट केल्याने आपल्याला हे वॅक्स आपल्यासाठी योग्य आहे का नाही समजण्यास मदत होते (Painless Wax).

· वॅक्सिंग करताना जर एखाद्या ठिकाणी जखम असेल तर, त्या जखमेच्या भागाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
अन्यथा संसर्गाचा धोका वाढू शकतो आणि तुम्हाला जखमेचा खूप त्रास होऊ शकतो (Side Effects Of Waxing).

· जेव्हा तुम्ही वॅक्सिंग कराल तेव्हा पट्टी वेगाने ओढण्याऐवजी हळूवारपणे ओढा.
वॅक्सिंग करताना ते जास्त गरम किंवा जास्त थंड नसावे याकडेही लक्ष द्यावे (Waxing At Home).

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | काँग्रेस नागपुरातून फुंकणार लोकसभेचे रणशिंग, महारॅलीसाठी नेत्यांची लगबग

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : मोबाईल लोन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक

Pune Police-Tarang 2023 | तरंग-2023: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा; सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार