आम्ही ‘मातोश्री’चे संबंध तोडले नाहीत, ‘मातोश्री’चं आमंत्रण आम्ही स्विकारलं; भाजप नेत्याचं सूचक विधान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर जळगावात एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. फडणवीसांच्या या दोन भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भेटीगाठीवरुन शिवसेना Shiv Sena खासदार संजय राऊत यांनी फडणवीस मातोश्रीवर देखील येतील असे म्हणाले होते. संजय राऊत यांच्या विधानाला बीड दौऱ्यावर असलेले भाजप आमदार आशिष शेलार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

फडणवीस आधी ‘सिल्वर ओक’ वर गेले, त्यानंतर ते खडसे यांच्या घरी गेले. आता ते ‘मातोश्री’वरही येतील असे वक्तव्य शिवसेना Shiv Sena खासदार संजय राऊत यांनी केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आशिष शेलार यांनी हा आमंत्रणाचा प्रकार असून आम्ही आमंत्रण स्विकारलं आहे, अशी सूचक प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे.

 

मराठा आरक्षणाचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’
पत्रकारांशी संवाद साधताना शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत कुकर्मातील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ केला आहे. याला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आहे. मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला आहे, अशी जोरदार टीका शेलार यांनी केली आहे.

ठाकरे सरकारला चले जावचा इशारा
आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधताना म्हणाले, समाजा समाजामध्ये तेढ लावण्याचं काम इंग्रजांनी केलं ते ठाकरे सरकार करत आहे. म्हणून इंग्रजांना चले जाव म्हणायची वेळ आली तसे ठाकरे सरकारला चले जावं असं असा इशारा आम्ही देत आहोत, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.

आम्ही ‘मातोश्री’चे संबंध तोडले नाहीत
संजय राऊतांनी एक दिवस देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर येतील, असं म्हणाले. आम्ही मातोश्रीसोबत कधीच संबंध तोडले नाही. पण त्यांनीच तोडले आहेत. राऊतांचं वक्तव्य हे आमंत्रणच असेल तर आम्ही स्विकारलं आहे, असे प्रत्युत्तर शेलार यांनी राऊतांना दिलं.

हे आरक्षण मोदी सरकारने दिले
आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला. हे आरक्षण मोदी सरकारने दिले होते. यात तुमचे कर्तृत्व काय ?
असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजाच्या मोर्चाची टिंगल टवाळी करण्याचे काम शिवसेनेने केले. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागण्याची हिंमत सुद्धा शिवसेनेने केली, त्यामुळे तुम्ही भावनाशून्य आहात. गायकवाड आयोगाची मांडणी योग्य पद्धतीने केली नाही, तेव्ह कर्तृत्व हीन आहात हे दिसून आले, अशा शब्दात आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.

 

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या