12 वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाबाबतचा निर्णय तातडीने घेऊ : मंत्री उदय सामंत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने रद्द केलेल्या इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षांचे (HSC exam) निकाल येत्या काही दिवसात लागतील. त्या अनुषंगाने प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रवेशाचा (first year admission) तातडीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

इस्लामपूर तहसिलदार कार्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासंदर्भात (first year admission) आयोजित ऑनलाईन बैठकीत मंत्री उदय सामंत (Uday Samant) बोलत होते.
इयत्ता 12 वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचा असतो.
यासाठी सीईटी परीक्षा महत्वाची असते.
या सीईटीच्या परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाची तयारी सुरु आहे.
तसेच 12 वीच्या निकालानंतर तातडीने प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
असे सामंत म्हणाले.
तंत्रशिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रिया साधारण जुलै, ऑगस्टपर्यंत चालते.
12 वी बोर्ड  परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच गुणांची टक्केवारी कळेल.
त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे धोरण राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरणार असल्याचे सामंत म्हणाले.
यावेळी बैठकीला वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसिलदार रविंद्र सबनिस, यतीन पारगावकर तसेच दूरदृश्य प्रणालीव्दारे विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक उपस्थित होते.

बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

Web Title : We will take a decision about the first year admission immediately after the result of 12th: Minister Uday Samant