Weather Alert : पुढच्या 24 ते 36 तासात देशात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, थंडी वाढणार !

नवी दिल्ली : चक्रीवादळ गेल्यानंतर आता त्याचा परिणाम दिसून येत आहे. काही ठिकाणी थांबून-थांबून पाऊस पडत आहे. यादम्यान, काही ठिकाणी पावसासह आता बर्फवृष्टी सुद्धा होण्याचा अंदाज असून यामुळे थंडी प्रचंड वाढणार आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये एक डिसेंबरपासून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर प्रमाणेच डिसेंबर महिना असेल. डिसेंबरची सुरूवात सुद्धा कडक्याच्या थंडीने होणार आहे. हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, येत्या आठवड्यात पावसासह थंडी सुद्धा वाढू शकते.

पुन्हा चक्रीवादळाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये विविध भागात गुरूवारपासून रविवारपर्यंत हलका पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत आलेले ईरानी चक्रीवादळ निवार अजून पूर्णपणे नष्ट झालेले नसतानाच आणखी एक चक्रिवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जो पुढील 36 तासात डीप डिप्रेशन मध्ये बदलण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात तो आणखी ताकदवान होऊ शकतो. यामुळे पुन्हा एकदा दक्षिण भारतात मोठ्या पावसाची शक्यता आहे. दोन डिसेंबरला दक्षिण भारतात याचा जास्त परिणाम दिसण्याचा अंदाज आहे.

बर्फाने अच्छादलेल्या पश्चिम हिमालयातून वाहणार्‍या थंड वार्‍यांमुळे पारा घसरला आहे. हवामान विभागाने अगोदर म्हटले होते की, सध्याची पश्चिम स्थिती प्रभावित झाल्यास किमान तापमान 2-3 डिग्री सेल्सियस वाढू शकते. ताजा अंदाज आहे की, 1 डिसेंबरला बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तमिळनाडु, पुदुचेरी आणि करायकल येथे 2 आणि 3 डिसेंबर, 2020 ला वेगवेगळ्या ठिकाणांसह काही ठिकाणी मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात अनेक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढील आठवड्यात थांबून-थांबून होत असलेली जम्मू आणि काश्मीरमधील बर्फवृष्टी थांबेल.

* राजस्थानच्या माऊंट आबूमध्ये एक डिग्रीवर पोहचला पारा, हवामान विभागाचा थंडी वाढण्याचा इशारा

* श्रीनगर-लेह मार्गावर सोनमर्ग-जोजिला अक्षसह लडाखला जोणार्‍या खोर्‍यात मोठी बर्फवृष्टी झाल्याचे वृत्त.

* काश्मीरच्या गुलमर्गसह अन्य क्षेत्रात पारा शून्यावरून 5.6 डिग्री सेल्सियसच्या खाली घसरला. ज्यामुळे उत्तर भारताच्या अनेक भागात थंडी वाढली.