‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर रिलीज : ‘बिग बी’ आणि आयुष्मानला पाहून येईल ‘टॉम अँड जेरी’ची आठवण !(व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता मेकर्सनी गुलाबो सिताबो हा सिनेमा 12 जून रोजी अॅमेझॉन प्राईमवर ऑनलाईन रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. बिग अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर या सिनेमाच्या ट्रेलरची घोषणा अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना आणि शुजित सरकार यांनी मिळून केली होती. यानंतर आता सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सध्या या ट्रेलरची खूप चर्चा होताना दिसत आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये

बिग बी अमिताभ एक हवेलीचे मालक आहे आणि आयुष्मान त्यांचा भाडेकरू आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, आयुष्मान लखनऊमधील एका हवेलीत भाड्यानं रहात आहे. सुरुवातीलाच कोणीतरी आयुष्मानचा बल्ब चोरल्यानं चिडचिड करत आहे. बिग बी यांचं नाव आहे मिर्झा आणि त्यांना बांके म्हणजेच आयुष्मान अजिबात आवडत नाही. ते त्याला हवेलीतून काढण्यासाठी शक्य तो प्रत्येक प्रयत्न करताना दिसत आहे. मिर्झा आणि बांके यांची नोकझोक पाहून तुम्हाला टॉम अँड जेरीच्या भांडणाचीही नक्कीच आठवण होईल. खूपच मजेदार असा हा ट्रेलर आहे. ट्रेलरनं आता चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे.

https://www.instagram.com/p/CAen0QcAgF1/?utm_source=ig_embed