Trailer : ‘किल्लर’ आहे कीर्ति सुरेशच्या ‘पेंग्विन’चा ट्रेलर, पाहून येईल अंगावर ‘काटा’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री कीर्ती सुरेश हिचा पेंग्विन हा सिनेमा 19 जून रोजी अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे जो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये ?

2 मिनिट 32 सेकंदाच्या पेंग्विन या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला भरपूर थ्रिल पाहायला मिळतं. या थ्रिलर सिनेमात कीर्ती सुरेश हिनं गर्भवती आईची भूमिका साकारली आहे जी आपल्या भूतकाळातील रहस्यांना शोधत असते आणि आपल्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी खतरनाक अशा प्रवासावर जाते. या सिनेमातून ईश्वर कार्तिक डायरेक्शनमध्ये डेब्यू करत आहे.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर हा सिनेमा तमिळ आणि तेलगू भाषेतही रिलीज होणार आहे.

पेंग्विनची अॅक्ट्रेस कीर्ती सुरेश सिनेमाबद्दल बोलताना सांगते, “मी आजवर जेवढे सिनेमे केले आहेत त्यात पेंग्विन हा सर्वात रोमांचक आणि रोचक सिनेमा आहे. ईश्वर कार्तिक सोबत काम करताना मजा आली. हा सिनेमा सर्वांना आवडेल यात शंका नाही. कारण त्यानं सिनेमात जीव ओतला आहे. हा सिनेमा तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.”