Weight Control | वाढत्या वजनाने अस्वस्थ असाल तर डाएटमध्ये समावेश करा ‘हे’ 5 फ्रुट्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Control | हिवाळ्यात आहार (Diet) आणि खाण्याच्या सवयी (Eating Habits) बदलतात. हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी असल्याने शरीराला उबदार राहण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. ही ऊर्जा (Energy) मिळवण्यासाठी मेटाबॉलिज्म (Metabolism) गती वाढते, ज्यामुळे जास्त भूक लागते आणि लठ्ठपणा (Obesity) कमी होण्याऐवजी तो अधिकच वाढतो (Weight Control).

 

फळे हा नैसर्गिक आहार (Fruits Are a Natural Foods)
वाढता लठ्ठपणा आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्यक्तिमत्वही बिघडते. हिवाळ्यात वजन वाढले (Weight Gain) तर लगेच आहार बदला. अशा 5 फळांचा आहारात समावेश करा, जी वजन नियंत्रित (Weight Control) ठेवतात आणि आरोग्य राखतात. वजन कमी करण्यासाठी फळे (Fruits) हा एक नैसर्गिक आहार आहे, ज्यामध्ये जीवनसत्त्वे (Vitamins), फायबर (Fiber) आणि इतर पोषक तत्वे (Nutrients) भरपूर असतात.

 

ही आहेत वजन कमी करणारी 5 फळे (5 Fruits for Weight Loss)
कमी कॅलरी (Calories) आणि फायबर युक्त फळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. फळांचे सेवन (Fruits Intake) केल्याने वजन कमी होते, ब्लड प्रेशर (Blood Pressure), ब्लड शुगर कंट्रोल (Blood Sugar Control) राहते, तसेच हृदयविकाराचा धोका (Heart Attack Risk) कमी होतो. वजन कमी करणारी 5 फळे जाणून घेवूयात. (Here Are 5 Fruits for Weight Loss)

 

1. संत्र्याचे सेवन करा : (Eat Oranges)
व्हिटॅमिन सी (Vitamin C) युक्त संत्र्यामुळे इम्युनिटी (Immunity) मजबूत होतेच पण वजनही नियंत्रित होते. जीवनसत्त्वे आणि फायबरने समृद्ध संत्र्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी संत्र्याचा ज्यूस (Orange Juice) पिऊ शकता.

2. टरबूजचे सेवन करा : (Eat Watermelon)
टरबूजाच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. यात कॅलरीज कमी आणि भरपूर पाणी असल्याने ते वजन कमी करण्यास मदत करते. फायबर, अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants), पोटॅशियम (Potassium), व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन (Beta-carotene), लाइकोपीन (Lycopene) समृद्ध फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

 

3. पपईचे सेवन करा : (Eat Papaya)
वजन कमी करण्यासाठी पपई खूप गुणकारी आहे. पपईमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, आयर्न, मिनरल (Minerals)
आणि फॉस्फरस (Phosphorus) असते जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते.
यामध्ये अनेक प्रकारचे पाचक एन्झाईम (Digestive Enzymes) आढळतात, जे अन्न पचवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

 

4. नाशपती खा : (Eat Pears)
फायबरने समृद्ध नाशपती खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे खूप प्रभावी फळ आहे.

 

5. आंबा खा : (Eat Mango)
फायबर, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि आयर्नने समृद्ध आंबा भूक कमी करतो आणि वजन नियंत्रित करतो. याचे सेवन केल्याने भूक लागत नाही.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Control | if you want to control weight so include these 5 fruits in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | मनसेचा 16 वा वर्धापनदिन पुण्यात ‘या’ ठिकाणी होणार साजरा.

 

YOGA Helps In Eating Disorder | तज्ञांकडून जाणून घ्या योगामुळे खाण्याच्या विकारात कशी मदत होऊ शकते !

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 318 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी