YOGA Helps In Eating Disorder | तज्ञांकडून जाणून घ्या योगामुळे खाण्याच्या विकारात कशी मदत होऊ शकते !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – YOGA Helps In Eating Disorder | अति खाणे (Overeating) आणि अजिबात न खाणे (Not Eating At All) हे एक प्रकारचे मानसिक विकार (Mental Disorder) आहे. यामध्ये एखादी व्यक्ती कधी कधी गरजेपेक्षा जास्त खाते, तर कधी खूप कमी खाते. इतके कमी की त्याचे वजन कमी होते (Weight Loss) आणि शरीर कृश (सडपातळ) होते. कमी किंवा अधिक खाण्याचा त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. बुलीमिया (Bulimia), द्विंज-खाणे आणि एनोरेक्सिया (Anorexia) हे सर्वात सामान्यपणे उद्भवणारे खाण्याचे विकार आहेत (YOGA Helps In Eating Disorder).

 

दरवर्षी देशात नॅशनल इटिंग डिसऑर्डर वीक (National Eating Disorder Week) साजरा केला जातो, जेणेकरून लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करता येईल. यंदा 21 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2022 या कालावधीत नॅशनल इटिंग डिसऑर्डर वीक (NEDAwareness Week) साजरा करण्यात येत आहे.

 

चिंता (Anxiety) आणि नैराश्यामुळे (Depression) खाण्याचे विकार (Eating Disorders) सहसा उद्भवतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जगभरातील सुमारे 0.9% स्त्रिया आणि 0.3% पुरुष एनोरेक्सियाने ग्रस्त आहेत. खाण्याच्या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी त्यांचे दु:ख, राग आणि चिडचिडेपणा दूर करण्यासाठी त्याची कारणे आणि त्यांना समजून घ्यायला लागेल. खाण्याच्या विकारावर वैद्यकीय उपचार शक्य असले तरी योग आणि ध्यानाच्या मदतीने त्यावर मातही करता येते.

योगाची कशी मदत होते (YOGA Helps In Eating Disorder) ?
योग (YOGA) केल्याने पचनक्रिया सुधारू शकते (Digestion Improves), बद्धकोष्ठता कमी होऊ शकते (Relieve Constipation)
आणि खाण्याची वाईट सवय कमी होऊ शकते.
योग करताना किंवा नंतर आपण भावनांना मुक्त करण्यास सक्षम होऊ शकतो.
माइंडफुलनेस (Mindfulness), योग (YOGA), ध्यान (Meditation) आणि श्वसनाशी संबंधित व्यायामाच्या (Breathing Exercise)
अभ्यासानुसार शरीर (Physical Stress) आणि मानसिक तणाव (Mental Stress) कमी होतो.

 

पुढील योगप्रकार ठरतात फायदेशिर (These Yoga Forms Are Beneficial)
अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने (American Psychological Association)
18 ते 30 वयोगटातील महिलांकडून 12 आठवड्यांपर्यंत योगाभ्यास (Yoga Practice) करवून घेतला,
त्यामुळे शरीर निरोगी होण्यास मदत झाली.खाण्याच्या विकृती कमी झाल्या, असे अभ्यासात आढळले.
सहभागींनी योगाबद्दल समाधान व्यक्त केले. म्हणजे हे संशोधन खाण्याच्या विकारावर उपचार करण्यास उपयुक्त आहे.

बालासन (Balasana) : ही एक लहान बाळाच्या बसण्यासारखी पोझ आहे, ज्यामध्ये गुडघे पुढे वाकतात आणि शरीर जमिनीवर/ फरशीवर वाकलेले असते. मॅटवर ठेवावे लागते.

 

चक्रासन (Chakrasana) : ही एक ऊर्ध्वमुखी धनुष्याची पोझ आहे, जी आपली छाती आणि फुफ्फुसे ताणते आणि आपले हात, पाय, पोट आणि पाठीचा कणा मजबूत करते.

 

ताडासन (Tadasana) : ताडासन हे सर्वात सोपे योगासन आहे, जे केल्याने शरीराचे संतुलन आणि पोटाचे आरोग्य सुधारते.

 

धनुरासन (Dhanurasana) : ही पोझ खाण्याच्या विकाराशी संबंधित सर्व समस्यांमध्ये आराम देते आणि पाचक, बद्धकोष्ठता, पोटात पेटके दूर करण्यास मदत करते.

 

खाण्याचे विकार कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार (Surya Namaskar), प्राणायाम (Pranayama) आणि योग निद्रा (Yoga Nidra) ही आसनेही उपयुक्त ठरतील.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#हेल्थ टिप्स #हेल्दी लाइफस्टाइल #नैशनल ईटिंग डिसऑर्डर वीक 2022 #ईटिंग डिसऑर्डर #ईटिंग डिसऑर्डरसाठी योगासने #lifestyle #health #health tips #healthy lifestyle #National Eating Disorder Week #Eating Disorder #Yoga for eating disorder #Lifestyle and Relationship #Health and Medicine

 

 

Web Title :- YOGA Helps In Eating Disorder | national eating disorder week know experts views on how yoga helps in eating disorder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | ‘5 वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री होते, तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण?’ पुणे राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

 

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! म्हटले – ‘कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर दुसर्‍या पत्नीपासून झालेले मुल अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र’

 

Mutual Fund | सेवानिवृत्तीच्या नंतर दरमहिना मिळेल 2 लाख रुपयांची पेन्शन, जाणून घ्या कशी करायची आहे गुंतवणूक?