Weight Loss Drinks | आयुर्वेदाचार्यांनी अमृत समान बनवले आहेत हे ३ फॅट लॉस ड्रिंक्स, एक महिन्याच्या आत वितळू लागते चरबी, अजमावून पहा

नवी दिल्ली : Weight Loss Drinks | इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, कलारी रसायन आयुर्वेदचे आयुर्वेदाचार्य यांनी मिळून वेट लॉससाठी अनेक गोष्टींवर अभ्यास केल्यानंतर अमृत समान काही ड्रिंक्स बनवले आहेत, ज्यामुळे वेट लॉसमध्ये (Weight Loss Drinks) जबरदस्त फायदा होतो. हे ड्रिंक्स नियमित सेवन केल्यास एक महिन्याच्या आत पोटाची चरबी वितळू लागते.

१. नॅचरल टी ड्रिंक्स (Natural Tea Drinks) –
हे हळद, पुदिना, लेमन ग्रास यांसारख्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून बनवले जाते. हे ड्रिंक इम्युनिटी वाढवते. मेटाबॉलिज्म बूस्ट करते. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. पित्ताचे उत्पादन वाढते. हे पित्त चरबी जलद बर्न करण्यास मदत करते.

कृती-
हे पेय तयार करण्यासाठी १०० ग्रॅम सुंठ, ५ ग्रॅम पुदिना, १० ग्रॅम हळद आणि ५ ग्रॅम लेमन ग्रास घ्या. यानंतर, हे सर्व एकत्र उकळवा आणि नंतर ते गाळून सकाळी लवकर सेवन करा. महिनाभरात त्याचा परिणाम दिसून येईल.

२. इम्युनिटी ड्रिंक्स (Immunity Drinks) –
इम्युनिटी ड्रिंक्समध्ये काही फळे आणि औषधी वनस्पतींचे मिश्रण तयार केले जाते. यासाठी ५० ग्रॅम बीट, ५० ग्रॅम गाजर, १० ग्रॅम आले, १० ग्रॅम हळद आणि १०० मिली संत्र्याचा ज्यूस घ्या. हे सर्व मिसळून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करा. त्यानंतर ते गाळून सकाळी सेवन करा. त्यात चवीनुसार काळे मीठ घालू शकता. काही दिवसांनी फरक दिसून येईल. (Weight Loss Drinks)

३. काळी मिरी, जिरे, आले ड्रिंक्स –
काळी मिरीमध्ये एक घटक मेटाबॉलिज्म वाढवतो. मिरीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. मिरी नैसर्गिकरित्या इन्सुलिन वाढवते.
यातील अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतात.
म्हणूनच काळी मिरी, आले आणि जिरे यांचे ड्रिंक्स वजन कमी करते.

कृती –
हे ड्रिंक्स बनवण्यासाठी ५० ग्रॅम आले, १/४ चमचे जिरे, अर्धा चमचा काळी मिरी घ्या.
सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि बाजूला ठेवा. यामध्ये पाणी घाला.
उकळू द्या. थंड करून गाळून घ्या आणि सकाळी लवकर सेवन करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ओंकार बाणखेले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दुहेरी मोक्क्यातील टोळी प्रमुख सुधीर थोरात याला जामीन मंजुर