बंगालमध्ये BJP चे शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या कारवर हल्ला; TMC नेत्यावर आरोप

कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये आज ५ जिल्ह्यात विधानसभा निवडणूक होत आहे. तर तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) रामराम करून भाजप पक्षात गेलेले शुभेंदू अधिकारी यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्या कारवर कांठी यथे हल्ला करण्यात आला आहे. परंतु, यावेळी सौमेंदू अधिकारी हे गाडीमध्ये नव्हते. तर कारवर झालेल्या हल्ल्यात ड्राइवर जखमी झाला आहे. या प्रकरणावरून या हल्ल्याचा आरोप टीएमसी पक्षावर करण्यात येत आहे.

तर सुवेंदू अधिकारी यांचे बंधु दिब्येंदू अधिकारी यांनी आपल्या भावाच्या कारवर झालेल्या हल्ल्यासाठी TMC नेत्यावर आरोप करत म्हणाले, मला माहिती मिळाली आहे, की TMCच्या ब्लॉक अध्यक्षाने सौमेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला करवला. यामध्ये गाडीचालकालाही मारहाण करण्यात आली आहे. तर हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. कारवर झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. असे दिब्येंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.

 

 

 

दरम्यान, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील गारघेटा विधानसभा मतदारसंघात CPMचे उमेदवार सुशांत घोष यांच्यावरही हल्ल्याचा प्रकार घडला होता. मतदानाला सुरुवात होण्याआधी, मेदिनीपूर जिल्ह्यातील भगवानपूर विधानसभा मतदारसंघातील सतसतमल येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत २ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. तसेच, बंगाल मधील मतदान पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. तर निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर CAPF च्या ६५९ तुकड्या तैनात केल्या आहेत.